Ahmednagar Crime | धक्कादायक ! माजी नगराध्यक्षा श्यामला ताडे यांची गळफास घेऊन आत्महत्या; संपुर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Crime) श्रीगोंदा नगरपालिकेच्या (Shrigonda Nagar Palika) माजी नगराध्यक्षा श्यमला मनोज ताडे Former Mayor Shyamla Manoj Tade (वय-40) यांना आज (सोमवार) पहाटे गळफास (hanging) लावून घेत आत्महत्या (commits suicide) केली. या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar Crime) खळबळ उडाली आहे. ताडे यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु, अलीकडच्या काळात त्या फारसे राजकारणात नसल्याने आणि कौटुंबिक कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून चौकशी सुरु असून जबाब नोंदवण्यात येत आहे. यानंतर आत्महत्येचं कारण समजू शकणार आहे.

 

आज पहाटे ताडे यांचा मृतदेह त्यांच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी साडीने गळफास लावून घेतला. दगडू ताडे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात (Shrigonda Police Station) घटनेबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ताडे यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत (Ahmednagar Crime) घोषित केले.

 

पोलीस निरीक्षक रामराव ढिकले (Police Inspector Ramrao Dhikale) यांनी घटनास्थळी भेट दिली.
श्यामला ताडे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.
कुटुंबीयांकडून माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
10 वर्षापूर्वी ताडे या श्रीगोंद्याच्या अडीच वर्षे नगराध्यक्षा होत्या.
त्यावेळी हे पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. अलीकडे त्या किंवा त्यांचे पती शहराच्या राजकारणात सक्रिय नव्हते.

 

Web Title :- Ahmednagar Crime | former mayor of shrigonda hangs self at home

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा