माणूसकीला काळीमा फासणारी घटना ! आजोबाने केला नातीवर लैंगिक अत्याचार ; गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पारनेर तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 16 वर्षाच्या नातीवर आजोबा व तिच्या भावाने गेल्या वर्षी अत्याचार केला. सदर पीडित नात गर्भवती राहिल्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना अटक केली आहे. पिडीत १६ वर्षाची मुलगी शेतात काम करत असताना आजोबा व तिच्या भावाने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. यासंबंधी कुठे वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे या मुलीने कोणालाही हा प्रकार सांगितला नाही.

पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने तिच्या पोटात वारंवार दुखू लागले. त्यामुळे तिला वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता ती गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पारनेर तालुका हादरून गेला आहे.