‘मोबाईल’ बाथरूममध्ये पडला, पतीने पत्नीच्या डोक्‍यात घातली खुर्ची

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीने दरवाजा ढकलल्याने बाथरूममधील पतीचा हातातील मोबाईल खाली पडला. त्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात खुर्ची घातले तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगरमध्ये ही घटना घडली.
मारहाणीत पत्नी विद्या सिद्धार्थ जाधव या जखमी झाल्या आहेत. काल सकाळी सिद्धार्थ जाधव हे बाथरूमला गेले होते. त्यांनी आतून दरवाजा लोटलेला होता. पत्नी विद्या हिने बाहेरून दरवाजा ढकलला. त्यामुळे धक्का लागून सिद्धार्थ जाधव याचा मोबाईल बाथरूममध्ये खाली पडला. त्यामुळे रागावलेल्या पतीने पत्नीच्या डोक्‍यात खुर्ची घातली. तसेच लाथाबुक्क्यांनी हात, पाय, पाठीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नी विद्या जाधव या जखमी झाल्या आहेत.
याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात विद्या जाधव यांच्या फिर्यादीवरून पती याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सिद्धार्थ नामदेव जाधव (रा. महादेव मंदिरा जवळ, गांधीनगर, बोल्हेगाव, नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

You might also like