Ahmednagar Crime News | कोपरगावात पोटच्या लेकाचा खून करून आरोपी महिलेने रचला अपहरणाचा बनाव

कोपरगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Ahmednagar Crime News | अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये ‘हा मुलगा माझा नाही’ असे म्हणून नवरा वारंवार भांडण करत असल्याने आईने पोटच्या पाच महिने सात दिवसांच्या कोवळ्या बाळाची मारहाण आणि गळा दाबून हत्या केली. एवढेच नाहीतर या खुनाचा आपल्यावर आळ येऊ नये म्हणून या निर्दयी महिलेने कोवळ्या जिवाचा मृतदेह विहिरीत टाकून अपहरण झाल्याचा बनाव रचला. (Ahmednagar Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
शुभम सूरज माळी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे तर गायत्री सूरज माळी (वय 20, रा. कारवाडी, ता. कोपरगाव) असे अटक करण्यात आलेल्या निर्दयी महिलेचे नाव आहे. गायत्री माळी ही पतीसह कारवाडी या ठिकाणी राहत होती. या महिलेचे लग्नापूर्वी गावातीलच परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध होते. हे संबंध तिने सूरजला लग्न करण्यापूर्वीच सांगितले होते. त्यानंतर तिला शुभम हा मुलगा झाला. सोमवारी गायत्रीच्या नवऱ्याने ‘शुभम हा माझा मुलगा नाही’ असे म्हंटल्यामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला. याचा राग मनात धरून गायत्रीने शुभमला मारहाण करून गळा दाबून त्याची हत्या केली. यानंतर या खुनाचा आपल्यावर आळ येऊ नये म्हणून गायत्रीने मृतदेह सुधाकर दंडवते यांच्या विहिरीत फेकून दिला आणि दोन दाढीवाल्यांनी मुलाला पळवून नेल्याचा बनाव रचला. (Ahmednagar Crime News)

यानंतर पती सूरज व आणखी गावातील काही लोकांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तातडीने धाव घेऊन शुभमच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. मात्र, शुभमला पळवून नेणारी माणसे शोधूनही न सापडल्याने पोलिसांना आरोपी महिलेवर संशय आला. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेची कसून चौकशी केली. यानंतर तिने आपला गुन्हा मान्य केला. मीच माझ्या हाताने मुलाला मारहाण करून गळा दाबला व त्याचा खून केल्याचे, त्यानंतर त्याचे प्रेत दंडवते यांच्या विहिरीत टाकल्याचे तिने कबूल केले. यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि त्या विहिरीत शोध घेतला असता, शुभमचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी या निर्दयी आरोपी महिलेला अटक केली. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुशांत धाकराव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title :-Ahmednagar Crime News | mother killed five month son

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shiv Sena Party Office | विधीमंडळ पाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे, राऊतांसह ‘या’ खासदारांना नो एंट्री!

IPS Sudhir Hiremath | पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) नियुक्ती

Pune Kasba Peth Bypoll Election | चंद्रकांत पाटलांची ‘महाविकास’वर सडकून टीका; म्हणाले – ‘दिशाहीन काँग्रेसचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार?’