Ahmednagar Crime News | श्रीरामपूर शहरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी डॉ. विजय मकासरे यांच्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाकडून रद्द; खोटा गुन्हा दाखल केल्यावरून डॉ. मकासरे करणार अब्रुनुकसानीचा आणि मानहानीचा दावा

Ahmednagar Crime News | The then police inspector of Srirampur city Srihari Bahirat Dr. Case filed against Vijay Makasare quashed by High Court; After filing a false case, Dr. Makassare will sue for damages and defamation
file photo

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ahmednagar Crime News | राहुरी येथील डॉ. विजय मकासरे (Dr. Vijay Makasare) यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने (High Court) रद्द केला असल्याची माहिती अ‍ॅड. डी. आर मरकड (Adv. D. R Markad) यांनी दिली. (Ahmednagar Crime News)

काय आहे प्रकरण?

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका जुन्या गुन्ह्यातून डॉ. विजय मकासरे यांचे नाव वगळण्यासाठी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी लाचेची मागणी (Demanding a Bribe) केली होती असा आरोप
डॉ. मकासरेंचा आहे. याबाबत डॉ. विजय मकासरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे
(Anti Corruption Bureau Ahmednagar) तक्रार केली होती.
याची पडताळणी करण्यासाठी एसबीच्या अधीकाऱ्यांनी सापळा रचून पंचासह डॉ. मकासरे यांना त्यांच्या गाडीतून पोलीस ठाण्यासमोर पाठवले.
मात्र एसीबीने (Ahmednagar ACB Trap) सापळा लावल्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट
(Police Inspector Srihari Bahirat) यांच्या लक्षात आल्याने त्यांनि पोलीस कॉन्स्टेबल रिचर्ड गायकवाड
(Police Constable Richard Gaikwad) याला पाठवून डॉ. मकासरे यांची गाडी पोलीस ठाण्यात घेऊन येण्यास सांगितले असा आरोप डॉ. मकासरेंचा आहे. (Ahmednagar Crime News)

डॉ. मकासरेंच्या म्हणण्यानुसार श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या सांगण्यावरुन पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड हे जबरदस्तीने गाडीत बसले आणि गाडी पोलीस ठाण्यात घेण्यास सांगितले. मात्र, डॉ. मकासरे यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे गाडी बेलापूर रोडने नेली. हा सर्व प्रकार रिचर्ड गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना फोन करुन सांगितला. तसेच बेलापूर रोडला येण्यास सांगितले.

डॉ. मकासरेंच्या म्हणण्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आणि पोलीस कर्मचारी किशोर जाधव यांनी खाजगी गाडीने डॉ. मकासरे यांच्या गाडीचा पाठलाग केला.
बहिरट यांनी डॉ. मकासरे यांच्या गाडीला गाडी आडवी लावली व डॉ. मकासरे यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्याच्या उद्देशाने धावून आले.
हा सर्व प्रकार सुरु असताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन हा प्रकार आमच्या सांगण्यावरुन झाला असून डॉ. मकासरे यांच्यावर गुन्हा दाखल करु नका असे सांगितले.
मात्र पोलीस निरीक्षक बहिरट यांनी रिचर्ड गायकवाड यांना डॉ. मकासरे यांच्या विरोधात तक्रार देण्यास सांगून सरकारी कामात अडथळा केल्याच्या कलमासह इतर कलमांतर्गत 10 जुलै 2019 रोजी गुन्हा दाखल केला.

डॉ. मकासरेंच्या म्हणण्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी चुकीच्या पद्धतीने तपास करुन दोषारोप पत्र
(Charge Sheet) दाखल केले. या विरोधात डॉ. विजय मकासरे यांनी अ‍ॅड. दत्तात्रय मरकड
(Adv. Dattatraya Markad) यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या प्रकरणात न्यायालयाने डॉ. मकासरे यांच्या गाडीत असलेले सीसीटीव्ही फुटेज व एसीबीच्या अधिकाऱ्यांनी
केलेल्या कारवाईचे कागदपत्र पाहून तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी चुकीच्या पद्धतीने तपास केला.
तसेच एसीबीकडून गुन्हा दाखल होऊ नये यासाठी डॉ. विजय मकासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे
मत नोंदवून डॉ. विजय मकासरे यांच्या विरुद्धचा दाखल गुन्हा रद्द केला.

अब्रुनुकसानीचा दावा करणार

डॉ. विजय मकासरे हे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व इतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात खोटा गुन्हा
दाखल केला म्हणून अब्रु नुकसानीचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे अ‍ॅड. दत्तात्रय मरकड यांनी सांगितले.

Web Title :- Ahmednagar Crime News | The then police inspector of Srirampur city Srihari Bahirat Dr. Case filed against Vijay Makasare quashed by High Court; After filing a false case, Dr. Makassare will sue for damages and defamation

Total
0
Shares
Related Posts