Ahmednagar Crime News | झेंडा लावण्यावरुन अहमदनगरमध्ये दोन गटात दंगल; ६ जण जखमी, १६ जणांना केली अटक

अहमदनगर : Ahmednagar Crime News | सावेडी उपनगरातील गजराम नगर येथे दोन गटांमध्ये झेंडा लावण्यावरुन जोरदार चकमक होऊन त्याचे रुपांतर दगडफेकीत झाले. या घटनेत ६ जण जखमी झाले. काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेचे पडसाद शहरात काही ठिकाणी उमटून दगडफेकीच्या घटना घडल्या. अहमदनगर पोलिसांनी (Ahmednagar Police) तातडीने संपूर्ण शहरातील बंदोबस्तात वाढ केली असून याप्रकरणात १६ जणांना अटक (Arrest) केली आहे. (Ahmednagar Crime News)

सावेडी भागातील गजरातनगर परिसरात झेंडे लावण्यात आले होते. त्यावरुन मंगळवारी सायंकाळी दोन गटात बाचाबाची झाली होती. त्यातून एका गटाकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. या घटनेत ६ जण जखमी झाले. काही वाहने जाळण्यात आली. त्यानंतर रात्री एका तरुणाला मारहाण (Beating) करण्यात आली. त्यानंतर काही मिनिटात छत्रपती संभाजीनगरकडे (Chhatrapati Sambhajinagar) जाणार्‍या महामार्गावर मोठा जमाव जमा झाला. या जमावाने महामार्गावरील ट्रक व इतर वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या घटनांची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी जमाव मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. (Ahmednagar Crime News)

पोलीस अधीक्षक राकेश ओला (Ahmednagar SP Rakesh Ola) यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी रात्रभर बंदोबस्तावर असून आता शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

गजरानगर, वारुळवाडी मनपा कार्यालय परिसर, झेंडीगेट, सर्जेपुरा या भागात मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दलाची (SRP Force) तुकडी तैनात करण्यात आली आहे. शहरात सर्वत्र मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.

Advt.

Web Title :- Ahmednagar Crime News | Two groups riot in Ahmednagar over flag hoisting; 6 people injured, 16 people arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप