Ahmednagar Crime | कोपरगाव शहर हादरलं ! भरदिवसा सोमवारच्या आठवडी बाजारात तरुणाचा खून

अहमदनगर / कोपरगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Ahmednagar Crime | अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon News) येथे भरदिवसा एका तरूणाचा खून (Murder in Kopargaon) केल्याची खळबळजनक घटना (Ahmednagar Crime) घडली आहे. येथील बाजारतळ भागात आठवडे बाजारात भरदिवसा दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास सात ते आठ जणांनी रॉड, फावड्याचा दांडा, गज आणि दगडाने ठेचून मारहाण केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राजा बबन भोसले (Raja Baban Bhosle) (वय, 35 रा. शिंगणापूर) असं खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, सोमवार हा कोपरगाव शहराचा आठवडी बाजार असतो या बाजारामध्ये दुपारच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी असते ज्या ठिकाणी घटना घडली तो बाजार तळाच्या मध्यवर्ती भागास खेटून जुन्या काले इमारतीच्या पश्चिम बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत हा प्रकार घडला. या तरुणाला 7-8 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली व 2 मोटारसायकली तेथेच सोडून पलायन झाले. याबाबत माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे (Kopargaon City Police Station) पोलीस निरीक्षक वासुदेव देसले (PI Vasudev Desale) यांनी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची पथके चौफेर रवाना केली. (Ahmednagar Crime)

भरदिवसा आठवडे बाजाराच्या भर गर्दीत या आजच्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण कोपरगाव शहर (Kopargaon News) हादरले आहे. संतप्त जमावाने संत जनार्दन स्वामी रुग्णालयाच्या तसेच भोसलेचा मृतदेह घेऊन येणार्‍या ॲम्बुलन्सच्या काचा फोडल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. दरम्यान, मृत राजा भोसले याला शहरातील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला मृत (Dead) घोषित केले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले (PI Vasudev Desale) यांनी दिली आहे.

 


Web Title :-
Ahmednagar Crime | Raja Baban Bhosle murder in kopargaon market of nagar district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Traffic Police | 5 ते 10 जानेवारी दरम्यान ‘या’ वेळेत संभाजी पुलावरील वाहतूक बंद राहणार

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 149 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 444 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ajit Pawar | कोरोनाची रूग्ण संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Crime | तरुणी गर्भवती राहिल्यावर तरुणाचा लग्नाला नकार, पुण्यात तरुणाविरुद्ध FIR