Ahmednagar Crime | प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या सख्या बहिणाचा खून करुन रचला आत्महत्येचा बनाव, आरोपी बहिणीवर FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – Ahmednagar Crime | अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत (Kokamthan Gram Panchayat) हद्दीत नगर मनमाड हायवे (Nagar Manmad Highway) लगत भन्साळी ट्रॅक्टर. शोरूम जवळ अल्पवयीन मुलगी वय वर्ष 17 हिने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली. यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास केला असता या घटनेत आत्महत्या केलेल्या व्यक्तीची सख्खी बहीण प्रमुख आरोपी असल्याचे निदर्शनास आले आहे. (Ahmednagar Crime)

 

आपले प्रेम प्रकरण उघड होऊ नये म्हणून आपल्या सख्ख्या बहिणीला गळफास देऊन तिने तिचे जीवन संपवल्याचा प्रकार उघड झाला आहे. सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत मुलगी हर्षदा नवनाथ बनकर (Harshada Navnath Bunkar) वय 16 ही आपल्या राहत्या घरी पलंगाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. (Ahmednagar Crime)

या घटनेनंतर उलट सुलट चर्चांना उधाण आले होते परंतु पोलिसांच्या तपासात तिची सख्खी बहिण
सृष्टी नवनाथ बनकर (Srishti Navnath Bunkar) हिने तिचा खून (Murder In Ahmednagar) केल्याचे आढळून आले आहे.
तिचा प्रियकर खंडाळा तालुका वैजापूर येथील आकाश कांगुने (Akash Kangune) याने तिला मोबाईल फोन घेऊन दिला होता
ही माहिती बहिणीने आपल्या आई-वडिलांना दिल्यामुळे आणि आपले प्रेम प्रकरण उघड झाल्याचा राग आल्याने सख्ख्या बहिणीने आपल्या बहिणीचा काटा काढला.
याबाबत आरोपीच्या आईनेच पोलिसात फिर्याद देऊन आपल्या मुली विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास शिर्डी पोलीस (Shirdi Police) उपविभागीय अधिकारी संजय सातव (Sub Divisional Officer Sanjay Satav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले (Police Inspector Vasudev Desale) करीत आहेत.

 

Web Title :- Ahmednagar Crime | Sakhya faked suicide by killing her sister who was an obstacle in love affairs, FIR against the accused sister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंचा पदभार स्वीकारताच धडाका, रुग्णालयात रात्री डॉक्टर नसल्यास थेट निलंबन, धाडसत्र सुरु

Pune Crime | लोनॲप” फसवणूक टोळीला ‘मोक्का’, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे ‘मोक्का’ कारवाईचे ‘शतक’

Dombivli Crime | बँक कर्मचाऱ्यानेच केली बँकेत चोरी, अखेर शेवटी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश