Ahmednagar Crime | कट्टर शिवसेना कार्यकर्त्याची आत्महत्या; परिसरात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ahmednagar Crime | अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील (Nagar Taluka) शिराढोण (Shiradhon) येथे एका कट्टर शिवसेना कार्यकर्त्याने (Shivsena Workers) आत्महत्या (Suicide) केली आहे. सुदाम रामदास वाघ Sudam Ramdas Wagh (वय-45) असे आत्महत्या करणाऱ्या शिवसैनिकाचे नाव आहे. सुदाम वाघ यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली. वाघ यांनी घरगुती वादातुन (Domestic Disputes) आत्महत्या (Ahmednagar Crime) केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सुदाम वाघ यांची नगर-सोलापूर रोडवरील (Nagar-Solapur Road) शिराढोण शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती ग्रामस्थांना आणि पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता मृतदेह सुदाम वाघ यांचा असल्याचे स्पष्ट झाले. सुदाम वाघ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील असा परिवार आहे. (Ahmednagar Crime)

 

घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप (API Rajendra Sanap) यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाघ यांनी आत्महत्या का केली, याचा तपास पोलीस करत आहे.
प्राथमिक चौकशीमध्ये वाघ यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण असल्याचे समोर आले आहे.
सुदाम वाघ हे कट्टर शिवसैनिक होते. परिसरातील राजकारणातही ते सक्रिय होते. यामुळे पोलीस सर्व शक्यता तपासून पाहत आहेत.
असे असले तरी या मागे कौटुंबिक वादाचे कारण आहे, याला दुजोरा मिळत आहे.

 

 

Web Title :- Ahmednagar Crime | Shiradhon shiv sena worker allegedly committed suicide in ahmednagar district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | पुण्यातील पाणीसमस्या 2-4 दिवसांत मार्गी लागेल – खासदार गिरीश बापट

 

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा अनोखा उपक्रम ! जिल्ह्यात पोलीसांकडून 30 ठिकाणी पाणपोईंची सोय

 

Uric Acid And Vitamin C Deficiency | ‘विटामिन-सी’च्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकते यूरिक अ‍ॅसिडची समस्या, ‘या’ वस्तूंचा आजच करा आहारात समावेश