अहमदनगर जिल्ह्यातील तरुणीनं वाघोलीत घेतला गळफास, आत्महत्या की अजून काय याचीच चर्चा

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑानलाइन – पुणे अहमदनगर महामार्गावरील वाघोली येथे रस्ताच्या कडेला लोखंडी राॕडला महिलेचा मृतदेह लटकल्याचा दिसल्याने या परिसरात खळबळ उडाली.
लोणिकंद पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, अहमदनगर जिल्ह्यातील नागापूर येथील विवाहित महिलेने वाघोली येथे येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. वाघोलीतील वाघेश्वर कॉम्प्लेक्स जवळील मैदानातील लोखंडी रॉडला तिने ओढणीच्या साह्याने गळफास घेतला.

अश्विनी गणेश तांबे ( वय 28, रा. नागापूर, जिल्हा – नगर ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून ती आपल्या आई सोबत सोमवारी रात्री नागापूरहून पुण्याकडे निघाली. वाघोली येथे उतरल्यानंतर तिने आईला सोडून पळ काढला. आईने तिचा शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने तीची आई परत नगरला गेली. दरम्यान अश्विनी हिने वाघेश्वर कॉम्प्लेक्स जवळील लोखंडी रॉड ला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी ट्रॅफिक नियंत्रण करणाऱ्या वॉर्डनला सांगितले. त्याने पोलीस ठाण्यात ही घटना कळविली. तिच्या कडे एक पर्स आढळून आली. त्यात आधार कार्ड, वाहन परवाना, डेबिट कार्ड व मोबाईल नंबर आढळून आला.परंतु आत्महत्याचे निश्चित कारण समजू शकले नाही.

लोणिकंद पोलिसानी तिचा जवळील नंबर वर संपर्क साधून कुंटूबीयांना याची माहिती दिली. नागापूरहून तिचे नातेवाईक आल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आला. तिचे माहेर बीड जिल्ह्यातील शिरपूर येथील असून पती गणेश हे मुंबईला खाजगी नोकरी करतात.
माञ एकदरीत या तरुणीने येवढ्या लांब येऊन आत्महत्या का केली यांचे गुडकायम आहे ?.
पुढील तपास लोणिकंद पोलिस करत आहेत.