अहमदनगर : वाडिया पार्क येथील अनधिकृत इमारतीवर हातोडा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – वाडिया पार्क क्रीडा संकुलात उभारण्यात आलेली अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यास सुरूवात केली आहे. आज सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाईस सुरुवात केली आहे. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

वाडिया पार्क क्रीडा संकुल उभारण्यात आलेली अनधिकृत इमारत अनेक वर्षांपासून वादात सापडली होती. या इमारतीचा वाद न्यायालयात गेला होता. अनधिकृत असलेली ही इमारत पाडण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला मुहूर्त सापडत नव्हता. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार येताच त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा अतिक्रमणविरोधी पथक प्रमुख सुरेश इथापे यांनी कारवाईचे नियोजन केले.

 आज सकाळीच पोलीस बंदोबस्तात अनधिकृत इमारत पाडण्यास सुरुवात केली. अनधिकृत इमारत पाडण्यास सुरुवात करताच शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. पूर्णपणे इमारत जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like