Ahmednagar Gram Panchayat member | ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार, हल्लेखोरांनी 5 गोळया झाडल्या; अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –   अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील ब-हाणपूर (ता. नेवसा) ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर (Ahmednagar Gram Panchayat member) अज्ञांतानी मंगळवारी (दि.15) रात्री गोळीबार (Firing) केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी 5 गोळ्या झाडल्या (5 shots fire) आहेत. यात गंभीर जखमी झालेला हा तरुण सदस्य वेळेत उपचार मिळाल्याने बचावला आहे. घटनेनंतर हल्लेखोर (Attacker) पसार झाले आहेत. हा हल्ला कोणी केला, कोणत्या कारणावरून केला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी शनिशिंगणापूर पोलिस  (Shanishinganapur Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

संकेत भाऊसाहेब चव्हाण असे जखमी ग्रामपंचायत सदस्याचे (Ahmednagar Gram Panchayat member) नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, संकेत चव्हाण मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूरकडे जात होते.
त्यावेळी रस्त्यात एका ठिकाणी ते लघुशंकेसाठी थांबले होते.
त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलातून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या (firing).
चव्हाण यांच्या पोटावर, हातावर, पायावर गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
त्यांना तातडीने नगरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
चव्हाण यांच्यावर उपचार करणारे डॉ. सोनवणे म्हणाले की, चव्हाण यांची प्रकृती आता स्थिर आहे.
त्यांच्या शरीरातून 3 गोळ्या काढल्या आहेत.
मात्र गोळ्या लागून गेल्याच्या आणखी काही जखमा त्यांच्या शरीरावर आहेत.
काही गोळ्या हाडांनाही छेदून गेल्या आहेत.सर्व शस्त्रक्रिया करण्यासाठी 4 तास लागले.
रुग्ण वेळेत उपचारासाठी आला अन् उपचाराला साथ दिल्याने एवढ्या गोळ्या लागल्यानंतरही त्याचा जीव वाचल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.
शनिशिंगणापूर पोलिस (Shanishinganapur Police) तपास करीत आहेत.

 

Web Title : ahmednagar gram panchayat member injured in firing at nevasa, Huge commotion in Ahmednagar district

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime News | सिंहगडावर पार्टीला जाण्यासाठी कोयत्याने धाक दाखवत पैशांची मागणी