Ahmednagar Hospital Fire |  अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडव निष्काळजीपणामुळे; गुन्हा दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी आग (Ahmednagar Hospital Fire) लागून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 6 जणांवर उपचार सुरु आहेत. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीबाबत (Ahmednagar Hospital Fire) पोलिसांकडून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांनी सांगितलं.

आयुक्त पांडे म्हणाले, निष्काळजीपणामुळे मृत्यूप्रकरणी अज्ञातांविरोधात भादंवि कलम 304 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस निरीक्षक (Police inspector) किंवा पोलीस उपायुक्त (DCP) दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, राज्य सरकारकडून या अग्निकांडप्रकरणाच्या (Ahmednagar Hospital Fire)
चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना असून सरकारनं वारंवार रुग्णालयांना फायर ऑडिट (Fire audit) करण्याच्या सूचना देऊनही अशा घटना घडतात हे दुर्दैवी आहे.

हे देखील वाचा

Aryan Khan Drug Case |  आर्यन खान प्रकरण घडवून आणलं ! त्याला 100 % अडकवले गेले, NCB चा साक्षीदार विजय पागारेंचा खळबळजनक दावा (व्हिडीओ)

Gram Suraksha Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनेत मिळताहेत बंपर रिटर्न, रोज 50 रुपये बचत केल्यास 35 लाख मिळतात ‘रिटर्न’; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ahmednagar Hospital Fire | a nagar fire case filed against unknown persons in case of death due to negligence Nashik Police Commissioner Deepak Pandey

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update