Ahmednagar Hospital Fire | ठाकरे सरकारकडून अहमदनगर जिल्हा रुग्णालय ‘आग’ प्रकरणी कठोर कारवाई ! सिव्हिल सर्जन डॉ. पोखरणा यांच्यासह 2 डॉक्टर, 3 नर्सचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागातील आग (Ahmednagar Hospital Fire) प्रकरणी ठाकरे सरकारने (Thackeray Government) गंभीर पाऊल उचलत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा (District Surgeon Dr. Sunil Pokhrana) यांच्यासह इतर दोन वैद्यकीय अधिकारी (Medical officer) आणि एका स्टाफ नर्सला निलंबित (Staff nurse suspended) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या प्रकरणी दोन स्टाफ नर्सना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ही माहिती दिली.

 

 

निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा,
वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे (Dr. Suresh Dhakne),
वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे (Dr. Visakha Shinde)
आणि स्टाफ नर्स सपना पठारे (Sapna Pathare) यांचा समावेश आहे.
तर स्टाफ नर्स आस्मा शेख (Asma Shaikh) आणि चन्ना आनंत (Channa Anant)
यांची सेवा समाप्त (Services terminated) करण्यात आल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

 

 

 

अहमदगनर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन सांगितले.

 

 

Web Title :- Ahmednagar Hospital Fire | ahmednagar district hospital fire case thackeray government suspends two medical officers including a district surgeon and dismissed two nurses

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा