Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ‘पीएम केअर फंडा’मधील व्हेंटिलेटरमुळे आग भडकली? आमदार रोहित पवारांना संशय

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची (Ahmednagar Hospital Fire) पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सायंकाळी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आगीच्या कारणांबाबत (Ahmednagar Hospital Fire) माहिती देताना सांगितले की, ही आग तेथील व्हेंटिलेटर मधून (Ventilator) भडकल्याचे आपल्याला कर्मचाऱ्यांनी सांगितले. कोरोना काळात पीएम केअर फंडातून (PM Care Fund) देण्यात आलेले व्हेंटिलेटर येथे आहेत. त्याकडेच रोहित पवार यांनी बोट दाखले आहे. परंतु यासंबंधी चौकशी झाल्याशिवाय घाईघाईने कोणाला दोष देता येणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

 

जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमधील (Corona ward) अतिदक्षा विभागाला (ICU) सकाळी आग (Ahmednagar Hospital Fire) लागली.
यामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सायंकाळी रोहित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्राकडे बोट दाखवल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
तर भाजप आमदारांनी (BJP MLA) यासाठी राज्य सरकारला (Maharashtra Government) जबाबदार धरले आहे.

 

व्हेंटिलेटर मधून आग भडकली

 

रोहित पवार म्हणाले, या रुग्णालयाने आणि येथील कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात चांगले काम केले आहे.
रुग्णांना मदत करणारा येथील स्टाफ आहे. परंतु आज ही दुर्दैवी घटना घडली आहे.
आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार येथील व्हेंटिलेटर मधून आग (Ahmednagar Hospital Fire) भडकल्याचे सांगण्यात आले.
हे व्हेंटिलेटर कोणी दिलेले आहेत, ते सदोष होते का, हे पहावे लागेल.

 

चौकशीतून सत्य पुढे येईल

 

व्हेंटिलेटरलाच आग लागल्याने कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन बंद केला. त्यामुळे आधीच अत्यावस्थ असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला.
आग पसरत गेली आणि ही भीषण घटना घडली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काळजी घ्यावी लागेल.
येथील व्हेंटिलेटर पीएम केअर फंडातून मिळालेले आहेत. असे असले तरी आम्ही कोणावर लगेच आरोप (Allegations) करणार नाही.
जे काही सत्य आहे ते चौकशीतून पुढे येईल, परंतु आज आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले, हेही नाकारुन चालणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले.

 

Web Title : Ahmednagar Hospital Fire | ahmednagar hospital fire ncp mla rohit pawar made serious allegations said about pm care fund

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

KISAN Credit Card | किसान क्रेडिट कार्ड इमर्जन्सीसाठी देऊ शकते कर्ज, 5 वर्षापर्यंत कर्ज परतफेडीची मिळते सुविधा, जाणून घ्या मिळवण्याची पद्धत

Diwali Shopping | गेल्या 10 वर्षातील सर्व रेकॉर्डब्रेक ! दिवाळीला 1.25 लाख कोटीच्या वस्तूंची विक्री; चीनचे 50 हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 661 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी