Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रूग्णालयात अग्नितांडव ! ICU वॉर्डला आग, 10 रूग्णांचा होरपळून मृत्यू (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  Ahmednagar Hospital Fire | शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अति दक्षता विभागातील (आयसीयू) कोरोना कक्षाला आज (शनिवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग (Ahmednagar Hospital Fire) लागली. त्यामध्ये तब्बल 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मयत झालेले सर्वजण 62 ते 70 वयोगटातील आहेत. 10 जणांचा मृत्यू झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, आगीला जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) हे तातडीनं अहमदनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

 

शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना तातडीने सरकारी मदत दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अहमदनगरच्या सिव्हील हॉस्पीटलमधील आयसीयू कक्षात 25 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आग  लागली आहे. त्यामध्ये आयसीयु कक्षातील सर्वजण गंभीररित्या भाजले.
जखमी झालेल्या तात्काळ इतर कक्षामध्ये हलवण्यात आले आहे. आगीत 10 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
अग्नीशमन दल, रूग्णालय प्रशासन आणि पोलिस प्रशासन मदत कार्यात व्यक्त होते.
घटनास्थळी स्थानिक आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) हे तातडीनं दाखल झाले आहेत. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.
जखमी झालेल्या काही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी दिली आहे.

Web Title  : Ahmednagar Hospital Fire | Fire at ahmednagar district hospital corona icu ward may be 11 dead

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold-Silver Price | दिवाळी संपताच 0.3% ‘स्वस्त’ झाले सोने, चांदी घसरून 63,741 रुपयावर आली

Mumbai Cruise Drugs Case | कोण आहेत आर्यन केसमधील नवीन NCB अधिकारी संजय सिंह, ‘या’ प्रकरणांचा केला होता तपास

Whatsapp New Update | आता 4 डिव्हाईसमध्ये चालेल व्हॉट्सअ‍ॅप, मोबाइल इंटरनेट कनेक्शनची सुद्धा नाही गरज; जाणून घ्या