जामखेडमध्ये आईसह 3 मुली विहिरीत बुडाल्या, परिसरात खळबळ

पोलिसनामा ऑनलाईन – आईसह 3 मुलींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना जामखेड तालुक्यातील कुसडगांव इथे घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

स्वाती राम कार्ले वय 30 , कोमल राम कार्ले वय 6, सायली राम कार्ले वय 9 , अंजली राम कार्ले वय 11 अशी मृतांची नावे आहेत. स्वाती कार्ले यांना तिन्हीही मुली होत्या. या दबावातून त्यांनी मुलींसह स्वत:ला विहिरीत झोकून दिले का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मात्र मिळालेल्या प्राथिमक माहितीनुसार आई आणि 3 मुली अशा चौघींचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. जामखेड पोलिस अधिक तपास करीत आहेत.