धक्कादायक ! पत्रकार बाळ बोठे यांनी दिली होती रेखा जरेंच्या हत्येची सुपारी, प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. पत्रकार बाळ ज. बोठे आणि सागर भिंगारदिवे या दोघांनी रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

गुरुवारी (दि. ३) पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. ते म्हणाले, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपी व्यतिरिक्त बाळ ज. बोठे (रा. बालिकाश्रम रोड) हा यामध्ये सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या तोच फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. बाळ बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी हत्येची सुपारी अन्य आरोपींना दिल्याचेही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची सोमवारी (दि. ३०) नगर-पुणे रोडवर जातेगाव फाट्यानजीक हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून, मुख्य सूत्रधाराच्या शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.