भाजपानेच सांगितलं भाजपचे 6 मंत्री अडचणीत : सुप्रिया सुळे

कर्जत : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराच्या तोफा धडाडल्या आहेत. प्रचारसभांना आता काहीच दिवस शिल्लक आहेत. या दरम्यान नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. निवडणूकीच्या निकालाआधी भाजपचा अंतर्गत सर्व्हे बाहेर आला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की भाजपचा अंतर्गत सर्व्हेच सांगतो की भाजपचे 6 मंत्री अडचणीत आहेत. या सहा मंत्र्यांमध्ये एकाचे नाव राम शिंदे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की सहा मंत्री अडचणीत असल्यामुळे भाजप प्रचंड चिंतेत आहे. आपले पोरगं पास होणार का नापास ? हे आईलाच माहिती असतं. आता भाजपचं म्हणत आहे की माझ पोरगं नापास होणार. त्यामुळे रोहित पवारने आरामात बसलं पाहिजे. 2 – 4 दिवस प्रचार केला नाही तरी चालेल. तुम्ही निवडून येणारच आहात. हे मी नाही भाजप म्हणतय.

कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये सभा झाली, या सभेत त्या बोलत होत्या. विशेष म्हणजे या सभेत अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार देखील उपस्थित होते. या सभेत सक्षणा सलगर, रुपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपने रोहित पवार यांच्या विरोधात राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे पवार कुटूंबाची प्रतिष्ठा या निवडणूकीत पणाला लागली आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या