home page top 1

नगर ‘एलसीबी’कडून दरोडेखोरांची टोळी ‘जेरबंद’ ; खुनाच्या गुन्ह्यात ८ वर्षापासून फरार आरोपीचाही समावेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दरोड्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने करंजी घाटात जेरबंद केली आहे. या टोळीतील नांगऱ्या भोसले हा सन 2011 पासून खुनाच्या गुन्ह्यात फरार होता. या टोळीकडून शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना खब-यामार्फत खात्रीशीर माहीती मिळाली कि, अहमदनगर ते पाथर्डी जाणारे रोडवर, करंजी घाटातील हजरत माणिकशहा पिरबाबा दर्गा परिसरात ४ ते ५ इसम हे कोठेतरी दरोडा घालण्याचे उद्देशाने एकत्र जमा झालेले आहेत. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोसई/ज्ञानेश फडतरे, पोसई/सचिन खामगळ, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, मोहन गाजरे, सोन्याबापू नानेकर, भाऊसाहेब काळे, बबन मखरे, पोना/संदीप घोडके, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रविन्द्र कर्डीले, संदीप पवार, विशाल दळवी, सुरेश माळी, रोहीदास नवगीरे, आण्णा पवार, दिनेश मोरे, सागर सुलाने, योगेश सातपुते, विनोद मासाळकर, विजय धनेधर, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल सोळंके, संदीप चव्हाण, चालक/बबन बेरड, चालक सचिन कोळेकर, चालक भरत बुधवंत अशांनी मिळून दोन पंचासह करंजी घाट येथे जावून मिळालेल्या बातमीनुसार हजरत माणिकशहा पिरबाबा दर्गा परिसरात सदर इसमांचा शोध घेत असताना दर्गाचे भिंतीचे आडोशाला पाच इसम अंधारात बसून
आपसात काहीतरी कुजबूज करीत असताना दिसले. त्यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना घेराव घालून रात्री २०/४० वा. चे सुमारास छापा टाकला असता त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने ते पळून जावू लागले. त्यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडून त्यांचे नावे, पत्ते विचारले असता त्यांनी त्यांचे नावे, पत्ते नांगऱ्या रुस्तम चव्हाण (वय- ३९ वर्षे, रा. टाकळी फाटा, ता- पाथर्डी), एकनाथ पिंपळ्या भोसले (वय-३१ वर्षे, रा. पिंपरखेडा, ता- गंगापूर, जि- औरंगाबाद), धरम दुशिंग भोसले (वय- २४ वर्षे, रा. टाकळी फाटा, ता- पाथर्डी), समाधान काजम काळे (वय- २६ वर्षे, रा. हात्राळ, ता. पाथर्डी), अमोल काजम काळे (वय- ३२ वर्षे, रा. हात्राळ, ता- पाथर्डी) असे असल्याचे सांगीतले. सदर इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये एक लोखंडी कटावणी, एक लोखंडी गज, दोन लाकडी दांडके व मिरची पुड अशी हत्यारे मिळून आल्याने सदरची हत्यारे जप्त करुन आरोपींविरुद्ध पोलिस नाईक रोहीदास शंकर नवगिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

नांगऱ्या रुस्तम चव्हाण, वय- ३९ वर्षे, रा. टाकळी फाटा, ता- पाथर्डी हा पाथर्डी पो.स्टे. गुरनं. 1 ८९/२०११, भादवि कलम ३०२, २०१, १२०(ब) या गुन्ह्यामध्ये सन २०११ पासून (आठ वर्षे) फरार आहे. तसेच आरोपी नामे अमोल काजम काळे, वय- ३२ वर्षे, रा. हात्राळ, ता- पाथर्डी हा पाथर्डी पो.स्टे, गुरनं. ७५९/२०१८, भादवि कलम ३८० या गुन्ह्यामध्ये फरार आहे.

Loading...
You might also like