Ahmednagar News । अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी, कॉलेज युवतीवर महिनाभर अत्याचार

अहमदनगर (Ahmednagar) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Ahmednagar News । अहमदनगर (Ahmednagar) येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या युवतीचे (College student) आक्षेपार्ह फोटो (Offensive photo) काढून त्या युवतीला बदनामीची धमकी देऊन आरोपीने त्या युवतीवर महिनाभर अत्त्याचार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युवतीचे लैंगिक शोषण (Sexual abuse) करून आरोपीने तिच्याकडे बदनामीची धमकी देऊन पैशाची मागणी (Demand money) केलीय. धास्ती घेतलेल्या युवतीने तिचे 8 ग्रॅम सोन्याचे दागिने त्याच्याकडे सुपूर्द केले. यानंतरही आरोपी त्रास देत असल्याने पीडित युवतीने अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये (Artillery police station) फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोहेल अख्तर सय्यद (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. पीडित युवती आणि आरोपी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. मधील काही काळात आरोपीनं पीडित युवतीशी मैत्री करून तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढले. यानंतर हे फोटोज समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेवर सतत बलात्कार केला आहे.

सोहेल सय्यद या आरोपीने 19 मे ते 17 जून या दरम्यान महिनाभर त्या युवतीवर अनेकवेळा
अत्याचार केला आहे. तर त्यानं पीडितेवर सोलापूर रोडवरील लॉज आणि चांदबीबी महाल परिसरात
अनेकदा बलात्कार केला आहे. अत्याचार करून देखील त्यानं आक्षेपार्ह फोटो प्रसारित करण्याची
धमकी देत, पीडितेकडं पैशाची मागणी केली. या दरम्यान, आरोपीनं पीडितेचं लैंगिक शोषण आणि
त्रास सुरूच ठेवला. यानंतर आरोपीच्या वारंवार त्रासाला कंटाळून पीडित युवतीने अहमदनगरमधील
तोफखाना पोलीस ठाण्यात (Artillery police station) तक्रार दाखल केली. पोलिसांनी
बलात्कार, धमकी आणि इतर कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत
अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Digilocker App | चोरी किंवा हरवण्यापासून Aadhaar, PAN आणि Driving License असे वाचवा, कुणीही लावू शकणार नाही हात

Bank of Maharashtra | महाराष्ट्र बँकेने 5 वर्षात बड्या थकबाकीदारांचे 10 हजार 130 कोटी केले राईट ऑफ; 100 कोटींपेक्षा अधिक कर्ज घेतल्यांकडून केवळ 9 % वसुली

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ahmednagar News । threatening to defame by uploading obscene photos college girl raped by many times in ahmednagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update