Ahmednagar News | …म्हणून 70 वर्षांच्या आजींनी थोपटली भाजप खासदार डॉ. सुजय विखेंची पाठ

अहमदनगर Ahmednagar : पोलीसनामा ऑनलाइन – एका कोरोनाबाधित 70 वर्षाच्या आजीच्या उपचारासाठी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी मदत केली होती. 14 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्या आजी ठणठणीत ब-या झाल्या आहेत. हॉस्पिटलमधून जाताना त्यांनी खासदार विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांची पाठ थोपटवत गोरगरीबांसाठी असेच कार्य करत रहा असा आशिर्वाद दिला. सध्या नगर शहरात Ahmednagar  या प्रसंगाची तुफान चर्चा रंगली आहे.

Gold Price Today : गेल्यावर्षीपेक्षा स्वस्त दराने सोने आणि चांदी खरेदी करण्याची संधी, किंमतीत पुन्हा घट, जाणून घ्या आजचे दर

गंगुबाई बर्डे (वय 70 रा. वरवडे, ता. राहुरी. जि. नगर Ahmednagar ) असे ह्या आजीचे नाव आहे.
गंगुबाई बर्डे यांना कोरोनाची बाधा झाली होती.
मुळा धरणाच्या दुर्गम भागात आदिवासी वस्तीवर त्या राहतात.
लक्षणे दिसल्यावर त्यांचा मुलगा अकुंश बर्डे यांनी तपासणी करून घेतली.
त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगून तातडीने व्हेंटीलेटर सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले होते.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी बेडची स्थिती आजच्याप्रमाणे नव्हती.
त्यामुळे त्यांना शोधाशोध करावी लागली. बर्डे यांनी थेट खासदार डॉ. विखेंना गाठले.
आपल्या आईची परिस्थिती त्यांना सांगितली.

संजय राऊतांचा विरोधकांना टोला, म्हणाले – ‘भाजपानं ते पत्र आणि शिवसेनेनं फसवलं यामधून बाहेर पडावं’

त्यावेळी विखे एका बैठकीत होते.
तातडीची गरज लक्षात घेऊन त्यानी यात लक्ष घातले.
बर्डेंना डॉ. विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले.
हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आजी ठणठणीत बऱ्या झाल्या.
हॉस्पिटलमधून जाताना त्यांनी पुन्हा खासदार विखे यांची भेट घेतली. आनंदाने आजीबाईंनी विखेंना मिठी मारली. जवळ घेत फोटोही काढून घेतला. गोरगरिबांसाठी असेच कार्य करत राहा, असा आशीर्वाद देत आजीबाई आपले पुढील आयुष्य जगण्यासाठी घरी परतल्या. या कोविड सेंटरमधून असे अनेक रुग्ण बरे होऊन बाहेर पडले आहेत. मात्र, या आजींच्या धाडसाचे कौतूक होत आहे.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

 

‘फडणवीस-पाटील ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी डाव’ टाकल्याशिवाय राहणार नाही’

 

महाराष्ट्र कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने केले पंतप्रधानांचे कौतुक, म्हणाले – ‘मोदी है तो मुमकिन है’