Advt.

Ahmednagar News | दुर्दैवी ! TV ची केबल जोडताना शॉक बसून तरुण गोळाफेकपटूचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – घरात आलेल्या टीव्ही केबलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने त्याचा शॉक बसून एका गोळाफेकपटूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) घडली. अजिंक्य सुरेश गायकवाड Ajinkya Suresh Gaikwad (वय-28) असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे. टीव्ही व्यवस्थित दिसत नसल्याने अजिंक्य केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी त्याला वीजेचा जोरदार धक्का (electric shock) बसला आणि काही क्षणात त्याचा मृत्यू झाला. या प्रकाराला संबंधित यंत्रणा जबाबदार असल्याचा दावा जागरुक नागरिक मंचाचे (jagruk nagrik manch) अध्यक्ष सुहासभाई मुळे (Suhasbhai Mule) यांनी दिली. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) खळबळ उडाली आहे.

शहरातील विनायक नगर परिसरात 1 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. अजिंक्य टीव्ही पाहत असताना व्यवस्थित दृष्य दिसत नव्हते. त्यामुळे केबल तपासण्यासाठी टीव्ही जवळ जाऊन त्याने केबलला हात लावला. केबलमध्ये वीज प्रवाह उतरला असल्याने त्याला वीजेचा जोरदार धक्का (electric shock) बसला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

अजिंक्य हा खेळाडू (sportsman) असून त्याने गोळाफेक मध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. माजी नगरसेवक सुरेश गायकवाड (Corporator Suresh Gaikwad) यांचा तो मुलगा होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस किंवा वीज कंपनीकडून कोणीही पाहणी करण्यासाठी आले नाही. गायकवाड हे जागरुक नागरिक मंचाचे सदस्य आहे. मंचाचे अध्यक्ष मुळे स्वत: अभियंता (Engineer) असून त्यांनी आणि मकरंद घोडके (Makrand Ghodke) यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
त्यावेळी ही धक्कादायक माहिती समोर आल्याचे मुळे यांनी सांगितले.
ज्या केबलचा धक्का बसला त्यामध्ये सुमारे 4 हजार होल्टचा वीज प्रवाह उतरला होता.
ही केबल उच्चदाब वीज वाहिनीच्या खांबावरुन, तारांवरुन टाकत घरात आणली होती.
केबल चालक अशा धोकादायक पद्धतीने केबल टाकतात, असा आरोप मुळे यांनी केला आहे.

Web Title : ahmednagar-news | ahmednagar sportsman ajinkya suresh gaikwad dies due to electric shock