छगन भुजबळ यांना रामदास आठवले यांची ‘ऑफर’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनालाइन – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना रिपाइंमध्ये या अशी ऑफर खुद्द रिपाइंचे अध्यक्ष आणि रामदास आठवले यांनी दिली. ते म्हणाले की, छगन भुजबळ यांना शिवसेना पक्षात घ्यायला तयार नसतील तर त्यांनी आमच्या रिपब्लिकन पक्षात यावे, त्यांच्यासारखा ओबीसी नेता आमच्याकडे आला तर पक्षाचा चेहरा मोहरा बदलून जाईल.

शिवसेनेने न घेतल्यास रिपाइंत यावे
आठवले म्हणाले की, छगन भुजबळ माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी ओबीसी समाजासाठी चांगला लढा दिला. ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे. मात्र नाशिकमधून त्यांना शिवसेनेत प्रवेशाला विरोध आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी सोडायची असल्यास शिवसेनेपेक्षा रिपाइंमध्ये यावे. आम्ही सर्वांना घेऊन सर्वसमावेशक काम करत आहोत. भुजबळ आमच्याकडे आले तर पक्षाला मोठा फायदा होईल. त्यामुळे त्यांनी आमच्याकडे यावे. त्यांच्या कार्याचा, अनुभवाचा आणि प्रतिमेचा पक्षाला फायदाच होईल.

युतीवर अजून चर्चा सुरु आहे. रिपाइंला देखील कोणत्या जागा द्यायच्या हे भाजप ठरवत आहे. 50-50 टक्कांचा फॉर्म्यूल्यावर सध्या विचार करण्यात येत आहे. रिपाइंला 10 जागा आम्ही मागत आहेत. भाजप सेवा युती व्हावी असे आपल्याला वाटते. त्यासाठी आपण आग्रही आहोत. युती झाली नाही तर भाजपला 175 जागा मिळतील, एकत्रित लढून आम्ही 230 ते 240 जागा मिळण्याचा आमचा प्रयत्न आहे असे ही ते म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like