हेल्मेटसक्तीचा ११८ पोलिसांना बसला फटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करीत असताना पोलीस अधीक्षक कार्यालयात या सक्तीचे उघड उघड उल्लंघन होत होते. हे पाहून अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या पोलिसांवर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत ११८ पोलीस अधिकारी, कर्मचारी हेल्मेट वापरत नव्हते किंवा सीट बेल्ट लावत नसल्याचे आढळून आले. त्या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस प्रशासनाने १ डिसेंबर २०१८ पासून नगर शहरात हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती केली आहे. हेल्मेट सक्तीचे मात्र पोलीसांकडूनच उल्लंघन होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वाहतूक शाखेला अधीक्षक कार्यालयात तपासणी मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते.  त्यानंतर सकाळी ९ वाजेपासून वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील तीनही प्रवेशद्वाराजवळ ठाण मांडून बसले.  हेल्मेट घालून न येणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला. सीटबेल्ट न वापरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील चालकांनाही दंड करण्यात आला. वाहनांचा इन्शुरन्स व परवाना नसणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कारवाई झालेल्यांमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, इतर विभागातील कर्मचारी व काही वकिलांचाही समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us