Advt.

Ahmednagar News | प्रेरणादायी ! कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलेला तरुणाने दिला आयुष्यभराचा ‘आधार’, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ahmednagar News | गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूने थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने अनेकांनी आपल्या जीवाभावाची माणसं गमावली (Corona deaths) आहेत. त्यामुळे देशात अनेक महिला विधवा झाल्या आहेत. अशा विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारकडून मदत केली जात आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) एका तरुणाने समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. या तरुणाने एका विधवा महिलेशी विवाह (Marriage with widow woman) केला आहे. त्याने संबंधित महिलेला आणि तिच्या नऊ महिन्याच्या बाळाला आयुष्यभराचा आधार दिला आहे. या अनोख्या निर्णयामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

किशोर राजेंद्र ढुस (Kishore Rajendra Dhus) असे या तरुणाचे नाव आहे. या अनोख्या लग्नामुळे किशोरचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच काही स्वयंसेवी संस्थांनी सरसावत दाम्पत्याला भरीव मदत केली आहे. किशोर हा नगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथील रहिवासी आहे. याच भागातील रहिवासी असणाऱ्या महिलेच्या पतीचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे (corona infection) निधन झालं होते. पदरी नऊ महिन्याचे बाळ असणाऱ्या महिलेच्या पतीनं अशी अचानक साथ सोडल्याने महिलेवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. (Ahmednagar News)

परंतु किशोर याने संबंधित महिलेसोबत विवाह करुन बाळासह तिचा स्विकार करण्याची तयारी दर्शवली. दोन्ही बाजूंनी संमती मिळाल्यानंतर हा अनोखा विवाह (Unique marriage) पार पडला आहे. यावेळी राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख (Fasiuddin Shaikh), राहुरी फॅक्टरी येथील अर्बन निधी संस्था व देवळाली प्रवरा हेल्थ टीम यांनी संबंधित लग्नासाठी पुढाकार घेतला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे (Rambhau Kale) यांनी ढुस दाम्पत्याचा सत्कार करुन त्यांना कपडे व वस्तू भेट दिल्या. विशेष म्हणजे राहुरी फॅक्टरी येथील अर्बन निधी संस्थेकडून बाळाच्या नावावर 11 हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात आली.

 

Web Title :- Ahmednagar News | Inspirational ! young man married with widow woman after her husband died with corona infection in ahmednagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | ‘बर्थडे’ पार्टीसाठी 22 वर्षीय तरूणीला तळजाई जंगल परिसरात नेलं, दारू ढोसल्यानंतर युवतीला थंडी जाणवली; तिथंच साईडला झोपवून बलात्कार

LIC Policy | एलआयसी पॉलिसीधारकांसाठी महत्वाची सूचना, तात्काळ उरकून घ्या ‘हे’ महत्वाचे काम; अन्यथा…

Manushi Chillar | मनुषी चिल्लरचा केशरी बिकनीमध्ये जलवा, मिस वर्ल्डच्या अदा पाहून चाहते ‘घायाळ’