Ahmednagar News | श्रीरामपूरमध्ये डाॅक्टर कुटुंबावर बहिष्कार; तीन महिन्यापासून जातपंचायतीकडून दिला जात आहे त्रास

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर (Ahmednagar News) जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंनिसच्या माध्यमातून 2013 ला जातपंचायत मूठमाती आंदोलन (MuthMaati Aandolan) राज्यात सुरू झाले आणि एप्रिल 2015 रोजी वैदू समाजाच्या जातपंचायतला मूठमाती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. मात्र काही ठिकाणी (Ahmednagar News) अजूनही जात पंचायत लोकांच्या मनात रुजली आहे. त्याच मानसिकतेतून निपाणी वडगाव गावातील आपल्या समाजातील एका सुशिक्षित डॉक्टर कुटुंबाला वैदू समाजाने वाळीत टाकल्याचे समोर आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर चंदन लोखंडे (Chandan Lokhande) हे आपल्या वैदू समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, जातपंचायत (Jat Panchayat) विरोधात लढा देत आहेत. समाजातील तरुण उच्च शिक्षण घेऊन अस्पृश्यतेची दरी दूर करावी यासाठी ते झटत आहेत. मात्र या दरम्यान बंद झालेली जात पंचायत काही दिवसांपूर्वीच पुन्हा उघडकीस आली. पाथर्डी तालुक्यातील (Ahmednagar News) मढी येथे पुन्हा जातपंचायत भरवण्यात आली. याबाबतचा एक व्हिडिओ ही समोर आला होता. या व्हिडिओच्या माध्यमातूनच तीन महिन्यांपूर्वी चंदन लोखंडे यांच्या परिवारावर जातपंचायतने अघोषित बहिष्कार टाकल्याचे समोर आले. ज्या दिवसापासून लोखंडे यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला त्या दिवसापासून कोणत्याच कार्यक्रमाला त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला बोलावले जात नाही आणि कोणीही त्यांच्या घरी ही जात नव्हते. एवढेच काय तर पंधरा दिवसांपूर्वी चंदन लोखंडे यांच्या आईचे निधन झाले. मात्र त्यानंतर देखील सांत्वनाला किंवा दशक्रिया विधीलाही जातपंचायतच्या फतव्यामुळे नातेवाईकांना त्यांच्याकडे जाता आले नाही. (Ahmednagar News)
आता या संबंधित लोखंडे यांनी अंनिसच्या राज्य समन्वयक रंजना गवांदे (State Coordinator of ANNIS Ranjana Gawande)
यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती रंजना यांनी दिली आहे.
आता सरकार आणि पोलिसांनी लवकरात लवकर पुन्हा नव्याने जातपंचायत सुरू होत
असल्याने यावर कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
2013 मध्ये सुरू झालेल्या जातपंचायत मूठमाती आंदोलनामुळे 14 जात पंचायत बरखास्त झाल्या होत्या.
मात्र आता पुन्हा एकदा जात पंचायत सुरू झाल्याने सरकारने आणलेल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी यावर
होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Web Title :- Ahmednagar News | jat panchayat boycott doctor family from caste due to his anti casteism activity
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update