धक्कादायक ! शाळकरी मुलाला पळवून ‘लैंगिक’ अत्याचार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. ही अल्पवयीन मुलगी कोपरगाव सुरेगाव येथील असून चौथीत शिकत आहे. या प्रकरणी गावातीलच तरुण अशोक निमसेविरोधात बलात्कार, बालक लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, अपहरण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शाळा सुटल्यावर मुलगी शुक्रवारी घरी चालली होती. त्यावेळी आरोपीने मोटार सायकलवरुन मुलीचे अपहरण केले. शनिवारी मुलगी गावात आढळून आली. त्यानंंतर तिने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने पोलिसांना दिली. शनिवारी रात्री उशीरा गुन्हा नोंदविण्यात आला. मुलीची शाळा सुटल्यावर शाळेबाहेर थांबलेल्या आरोपीने तुझ्या वडीलांना तुला घ्यायला पाठवल्याची बतावणी मुलीला केली. मुलीने विश्वास ठेवाला आणि ती आरोपीबरोबर गेली. परंतू मुलगी शाळेतून घरी न आपल्याने पालकांना मुलीचा तपास सुरु केला.

शाळेतील मैत्रिणींकडे मुलीबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा ती एका मोटार सायकलवर आलेल्या व्यक्तीबरोबर गेल्याचे कळाले. त्यानंतर या प्रकरणी कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यावरुन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाची ओळख झाली. पोलिसांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला. शनिवारी दुपारी मुलगी गावामध्ये आढळून आली. मुलीकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे लक्षात आले की तरुणाने तिच्यावर अत्याचार केले आहेत. रात्री उशीरा अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आता आरोपीचा शोध घेतल आले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/