‘झेंडा’ बदलण्यापेक्षा ‘मन’ बदलावे, आठवलेंनी दिला ‘मनसे’ ‘सल्ला’

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाअधिवेशनादरम्यान आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण झाले. मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर विरोधी पक्षांकडून मनसेवर टीका होऊ लागली आहे. तर शिवप्रेमी संघटनांकडून झेंड्याचा विरोध केला जात आहे. मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही. मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असा सल्ला रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे. अहमदनगर येथे पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवले बोलत होते.

काहीही फरक पडणार नाही
मनसेच्या सभेला गर्दी होती मात्र त्यांना मते मिळत नाही. आता तर त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडाच बदलला आहे. झेंडा बदलल्याने काहीही फरक पडणार नाही. पक्षाने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे असे आठवले म्हणाले. तसेच भाजपने मनसेसोबत युती करु नेये असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

कर्जमाफी मान्य नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली. मात्र, ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करून देण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पाळावे. सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली.

प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ भूमिकेला विरोध
इंदूमिल येथे साकारण्यात येणाऱ्या आंबेडकरांच्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला देण्यात यावा अशी मागणी बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला विरोध दर्शवत आठवले यांनी सरकारने वाडिया हॉस्पिटलसाठी वेगळा निधी द्यावे. ते बंद पडू पण इंदूमीलमधील स्मारक देखील पूर्ण झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like