Ahmednagar News | दुर्देवी ! आई पाठोपाठ पत्रकार मुलीचा देखील कोरोनामुळे मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर (Ahmednagar News) : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर (Ahmednagar News) जिल्ह्यातल्या अकोले येथील एका शिंदे कुटंबीयांवर (Shinde family) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठ दिवसापूर्वी झालेल्या आईच्या निधनापाठोपाठ मुलीने देखील जगाचा निरोप घेतला आहे. सुकृता शिंदे असे त्या मुलीचे नाव आहे. सुकृता हिने पत्रकारीतेमध्ये पदविका शिक्षण प्राप्त केलं होतं. विशेष म्हणजे सुकृता ही अकोले तालुक्यातील पहिली महिला पत्रकार आज तिने जगाचा निरोप घेतला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

अकोले महाविद्यालयातील (Akole College) सेवा निवृत्त उपप्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे (Jyeshtha Sahityak Pvt. Dr. Sunil Shinde) यांची कन्या सुकृता हिचे आज पहाटे कोरोनामुळे (corona) निधन झाले. आई सुनिताताई शिंदे यांच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी मुलीलाही कोरोनाशी लढताना अपयश आलं. रुग्णालयात उपचार घेताना कोरोना विरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर देखील तिला वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र, तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. या निधनामुळे अकोले तालुक्यात (Akole taluka) दुःख व्यक्त होत आहे.

मागील वर्षी सुकृताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगमनेर कॉलेजमधून यश संपादन केले होते.
जागतिक महिला दिन, महिलांना कायदे विषयक जनजागृती या संदर्भात तिचे लेख देखील प्रसिद्ध झाले होते.
विशेष म्हणजे अकोले तालुक्याच्या इतिहासात पहिली महिला पत्रकार म्हणून ती आपला ठसा उमटवत होती.
तिचे शिक्षण एम. ए मराठी, डी. एड अभ्यासक्रम यानंतर तिला पत्रकारिता विषयाची विशेष आवड होती.
म्हणून तिने पत्रकारिता अभ्यासक्रम ही पूर्ण केला होता.
दरम्यान, सुकृता हिचे लग्न ठरले होते. 4 मे (2021) रोजी तिचा विवाह होणार होता.
मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्न पुढे ढकलले होते. मात्र कोरोनामुळे लग्नाआधीच काळाने घाला घातला.

Wab Title :- Ahmednagar News | mother and daughter lost life because of corona in ahamadnagar

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये