राष्ट्रवादीच्या आमदाराची ग्रामस्थाला मारहाण, FIR दाखल

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाला टोकल्याच्या रागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी एका व्यक्तीला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आमदारांनी पोटात लाथ मारल्याची तक्रार एका ग्रामस्थाने केली आहे. यावरून राजूर पोलीस ठाण्यात आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रामदास लखा बांडे (वय-40 रा. खडकी ता. अकोले) यांनी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, खडकी गावातून आपण पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने एक गाडी आली. आम्हाला कट मारून ती पुढे गेली. कोणी तर पर्यटक असावेत म्हणून आम्ही जोरात ओरडून गाडी हळू चालवा असे म्हणालो. यावर काही अंतरावर जाऊन ती गाडी थांबली. त्यातून आमदार लहामटे उतरले आणि म्हणाले, मला ओळखले का मी कोण आहे, असे म्हणून त्यांनी माझ्या पोटात लाथ मारली व शिवीगाळ करून निघून गेले.

रामदास बांडे यांच्या तक्रारीवरून राजूर पोलीस ठाण्यात आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजूर पोलीस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like