Ahmednagar News । अहमदनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता; निवडणुकीतून काँग्रेसची माघार

अहमदनगर (Ahmednagar News) :  पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online)  – अहमदनगर (Ahmednagar) महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून (Ahmednagar Mayor Election) काँग्रेसने माघार घेतली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची (Shiv Sena-NCP) सत्ता निश्चित केली आहे. यामध्ये महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे (Rohini Shendge) आणि उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले (Ganesh Bhosale) यांची बिनविरोध निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना केवळ यांचेच अर्ज दाखल झाले आहेत. तर उद्याच्या सभेत यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान महापौरपदासाठी सर्वात पूर्वी उमेदवार जाहीर केलेल्या काँग्रेसने (Congress) मात्र माघारी घेतली आहे. (Ahmednagar Mayor Election)ahmednagar news | rohini shendge to be new mayor of ahmednagar

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

काँग्रेस (Congress) आणि भारतीय जनता पार्टीच्या (BJP) माघारीमुळे शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे (Rohini Shendge) व उपमहापौरपदी राष्ट्रवादीच्या गणेश भोसले (Ganesh Bhosale) यांची बिनविरोध निवड निश्चित झालीय. तर महापौरपदाचा उमेदवार नसलेल्या भाजप (BJP) उपमहापौरपदी देखील पुढं सरसावला नाही. अतिशय कमी जागा असून देखील काँग्रेस निवडणूक लढवण्यास पुढं सरसावला होता. परंतु अखेर मागे घेण्यात आलं आहे. तर याआधी शिवसेनेच्या अधिक जागा असून देखील राष्ट्रवादीच्या (NCP) पाठिंब्याने भाजपचे (BJP) महापौर आणि उपमहापौर होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर यामध्ये परिवर्तन करण्याची मागणी झाली. आता निवडणुकीपूर्वी यासंबंधीच्या हालचालींनी वेग घेतला आहे.

मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Shiv Sena-NCP) वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित बैठक होऊन पदांचे वाटप देखील झाले. या प्रक्रियेपासून काँग्रेसला (Congress) दूर ठेवण्यात आले होते. असे असले तरी निवडणूक जाहीर होण्याआधीच काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला होता. शिवसेना-राष्ट्रवादी यांचे एकत्र येण्याचे ठरल्यावरही काँग्रेसच्या उनेदवाराने अर्जही नेला. मात्र, तो अखेरपर्यंत दाखल केला नाही. तर, 30 जून रोजी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी ऑनलाइन सभा बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारपर्यंत होती. महापौरपदासाठी ठरल्याप्रमाणे कालच शिवसेनेच्या शेंडगे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीला (NCP) उपमहापौरपद मिळाले आहे. परंतु, त्यासाठी उमेदवार ठरत नव्हता. आज पुण्याहून पक्ष निरीक्षक अंकुश काकडे आले होते. त्यांनी आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी उच्छुकांशी चर्चा केली. मात्र अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ आधी गणेश भोसले यांचे नाव निश्चित केलं.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादीच्या (NCP) पाठिंब्याने भारतीय जनता पार्टीची (BJP) सत्ता होती. तेव्हा शिवसेना विरोधकांत होता. तर अधिकृत विरोधकाच्या भूमिकेत भाजप असला तरी त्यांची राष्ट्रवादीशी स्थानिक पातळीवरील जुनी मैत्री कायम राहण्याची शक्यता असल्यानं भाजपकडून सत्ताधारी शिवसेनेला अधिक टर्गेट केले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे याआधीही दुर्लक्षित राहिलेल्या काँग्रेस यापुढेही सत्तेविरुदध संघर्षच करीत राहणार की फरपटत आघाडीसोबत येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. असे असले तरी राष्ट्रवादीचे अंकुश काकडे म्हणाले, महाराष्ट्राच्या सत्तेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सहभागी आहे. राज्यातील हीच आघाडी नगरमध्येही एकत्र आहे. म्हणून आता नगरच्या विकासाला चालना मिळणार आहे. भाजपाने शांत राहून एक प्रकारे तेही आमच्यासोबत आहेत. याकारणाने आता नगरचा चांगला विकास होईल, असं काकडे यांनी म्हटलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : ahmednagar news | rohini shendge to be new mayor of ahmednagar

हे देखील वाचा

Amrita Fadnavis | लसीकरणाची आकडेवारी देत अमृता फडणवीसांचे ट्विट, म्हणाल्या – ‘हो, मी भक्त अन् त्याचा मला अभिमान’

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी वाचविले ‘प्राण’; पण त्याने खिडकीतून उडी घेऊन केली ‘आत्महत्या’

अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा