‘शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार यांच्याकडून राज्यसभेतील खासदारांसोबत अन्नत्याग करण्यात आला. मात्र हा अन्नत्याग जेव्हा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली तेव्हा केला असता तर मराठा समाजाच्या तरुणांना बरं वाटलं असतं अशी टीका माजी मंत्री विनोद तावडे यांच्याकडून करण्यात आली आहे. ‘मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर दोन दिवसात राज्य सरकार १८ हजार पोलीस भरतीचा निर्णय काढते. त्यावरून राज्य सरकारची नियत समजते व सरकार मराठा समाजाला कसे डावलते हे दिसून येतंय असा आरोप विनोद तावडे यांच्याकडून करण्यात आला आहे.

दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.या वेळी कृषि विधेयकावरून विनोद तावडे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विनोद तावडे म्हणाले, ‘शरद पवार साहेब स्वतः कृषिमंत्री होते.पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते.शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारकडून स्वीकारण्यात असत्या. पण केवळ विरोधासाठी विरोध शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री व ज्येष्ठ नेत्याने करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही,’ असे विनोद तावडे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आहे.

विनोद तावडे पुढे म्हणाले, ‘कृषी विषयक विधेयक नीट पाहिले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना मोदी सरकारने आणली आहे. या विधेयकामध्ये ज्या शंका होत्या त्या शंकाना उत्तर कपिल सिब्बल यांनी यांच्याकडून संसेदत देण्यात आले. त्यावेळी कपिल सिब्बल हे मंत्री होते. त्यामुळे शेतकऱ्याची दिशाभूल करणे , उगाच नको त्या शंका उपस्थित करणे, शेतकऱ्यांना घाबरवणे, शेतकऱ्यांना जसे वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना पिचत ठेवले आहे, तसेच पिचत ठेवण्याचे काम दुर्दैवाने विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. सर्वांनी मोकळेपणाने कृषी विधेयकवर उघड चर्चा करावी. उद्योगाविषयी विधेयकावर चर्चा केल्यानंतर शंभर दुरुस्त्या सुचवल्या होत्या त्यातील ऐंशी दुरुस्त्या स्वीकारण्यात आल्या होत्या. आता फक्त कृषी विधेयकाला विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये,’ असे माझं मत आहे असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like