अहमदनगर : अन्नातून विषबाधा, बहिण-भावाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील सख्ख्या भावा-बहिणीचा मृत्यू झाला आहे. संगमनेरमध्ये रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

कृष्णा सुपेकर (वय 6), श्रावणी सुपेकर (वय 9) ही मयत भावंडांची नावे आहेत. या दोघांची मोठी बहीण वैष्णवी (वय 13) हिच्यावर संगमनेरमधील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

याबाबत माहिती अशी की, मूळचे नांदूर खंदरमाळ येथील दीपक गंगाधर सुपेकर यांचे कुटुंब कामानिमित्त संगमनेर शहरात स्थायिक झाले आहे. शहरातील मालदाड रोडवरील आंबेडकरनगर वसाहतीत ते वास्तव्याला आहेत. मोलमजुरी करून सुपेकर व त्यांची पत्नी मंगल आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

रात्री नऊच्या सुमारास त्यांनी एकत्र जेवण केले. त्यानंतर काही वेळातच कृष्णा, श्रावणी, वैष्णवी व इतरांना त्रास होऊ लागला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना बहिण-भावाचा मृत्यू झाला.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like