‘पोलिसनामा’ इफेक्ट : ‘तो’ पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – वाळूची बेकायदा वाहतूक करणारे वाहन पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तडजोड करून सोडून दिले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा लेखी तक्रार अर्ज सचिन दशरथ गोरे (रा. नगर) यांनी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे दाखल केला होता. त्या तक्रार अर्जासोबत मोबाईल रेकॉर्डिंगही देण्यात आले आहे. ही बातमी ‘पोलिसनामा’ने प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत पोवार यांना निलंबित करण्यात आले आहे.

पोवार यांच्या विरोधात यापूर्वी काही तक्रारी होत्या. सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने पोवार यांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. ही घटना ताजी असतानाच वाळूचे वाहन सोडून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले. याबाबत गोरे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले होते की, ‘पारनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने 15 ऑगस्ट 2019 रोजी रात्री नऊ वाजता भाळवणी ते जामणगाव रोडवर वाळूची चोरटी वाहतूक करणारे वाहन पकडले होते. तडजोड करून हे वाहन सोडून देण्यात आले. पोलिसांनी पकडलेले वाहन पोलिस निरीक्षकांच्या सांगण्यावरून तडजोड करून सोडून देण्यात आले. हा प्रकार पोलिसांच्या प्रतिमेला काळिमा फासणारा आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक पोवार व इतर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी करण्यात आली होती.

सहाय्यक निरीक्षक गवळी पारनेरचे ‘इन्चार्ज’ –
कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गवळी यांच्याकडे पारनेर पोलिस ठाण्याच पदभार सोपविण्यात आला आहे. पोवार यांच्या निलंबनामुळे पारनेर पोलिस ठाण्याचे पद रिक्त झाले होते.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like