मुळा धरणात आढळला RTO एजंटचा मृतदेह; आरटीओ बंद होणार असल्याच्या भीतीने आत्महत्या केल्याचा संशय

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विमा आणि आरटीओ प्रतिनिधी (RTO Agent Suicide) म्हणून काम करणा-या एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह राहुरी तालुक्यातील मुळा धरणात आढळल्याने खळबळ उडाली आहे. ऑनलाइन (Online) पद्धतीने काम होणार असल्याने देशभरातील आरटीओ (RTO) बंद होणार असल्याच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र मृतदेहाजवळ किंवा घरी कोणतीही चिठ्ठी आढळली नाही. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात यासंबंधी अद्याप पोलिसांनी काहीही निष्कर्ष काढला नाही.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

गुलाब रानुजी मोढवे Gulab Ranuji Modhve (वय 58, रा. राहुरी फॅक्टरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Weather Alert | पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, मृत गुलाब मोढवे हे श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) कार्यालयात विमा आणि आरटीओ प्रतिनिधी (RTO Agent) म्हणून काम करत होते.
पण गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते.
सकाळी पेपर आणण्यासाठी जातो, असे सांगून ते घराबाहेर पडले.
त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. त्यांचा मोबाईलही बंद होता.
त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांना कळविले.
पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद घेऊन शोध सुरू केला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुळा धरणात वावरथ-जांभळी शिवारात पाण्यात कडेला एक मृतदेह तंरगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मृतदेह गुलाब मोढवे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
आधीच लॉकडाउनचा Lockdown फटका बसलेला असताना देशभरातील आरटीओतील (RTO काम ऑनलाईन होणार असल्याने आपले कसे होणार, या चिंतेने त्यांनी आत्महत्या (Suicide) केली असावी, असा तर्क लावला जात आहे.
सर्व बाजू लक्षात घेऊन तपास सुरू असल्याचे पोलिसांनी Police सांगितले.

Wab Title : ahmednagar rto agent suicide in shrirampur

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात