अहमदनगर : शिवसेनेच्या ‘या’ नगरसेविकेचे पद रद्द

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महानगरपालिकेच्या शिवसेनेचा विद्यमान नगरसेविका सारिका हनुमंत भुतकर यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. विभागीय पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्रही रद्द केले आहे. भूतकर यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे.
bhutkar

महापालिका निवडणुकीत सारिका भुतकर या चिन्हावर निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. निवडणूक लढतेवेळी त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याची पावती जोडली होती. मात्र त्यांचे जात प्रमाणपत्र विभागीय पडताळणी समितीने रद्द केले आहे. त्यामुळे भूतकर या जातवैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत.

दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे भूतकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिली. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर पुन्हा पोटनिवडणूक होणार आहे.

Visit : Policenama.com

You might also like