Ahmednagar | शेतकऱ्याकडून पंचनाम्याचे चारशे रुपये मागणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ahmednagar | परतीच्या पावसाने राज्यात (Rain in Maharashtra) धुमाकूळ घातला. यामुळे बळीराजा दुखावला आहे. यंदाची दिवाळी देखील गोड झाली नाही. राज्य शासनाने (State Government) शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करुन, योग्य ती मदत केली जात आहे. या पंचनाम्याची पाहणी करायला आलेले अधिकारी दिवाळी म्हणून शेतकऱ्यांकडून 400 रुपये उकळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची नेवासा (Nevasa) तालुक्यातील एका शेतकऱ्याने पोलखोल केली आहे. नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडीच्या रिंधे नावाच्या शेतकऱ्याने या प्रकराचा व्हिडीओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. त्यांनी हा लाच (Bribe) मागतानाचा व्हिडीओ प्रसार माध्यमांना पाठवून या प्रकारावर आवाज उठविला आहे. (Ahmednagar)

नेवासा तालुक्यातील या भ्रष्टाचारी आणि खिसेभरू अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे (Shinde Group) नेवासा तालुकाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांनी केली आहे. या शेतकऱ्यांना लुबाडण्याच्या प्रकारात तिघांवर कारवाई केली गेली आहे. नेवासा तालुक्याचे तहसीलदार रुपेश सुराणा (Tehsildar Rupesh Surana) यांनी ही कारवाई केल्याची माहिती दिली. सहायक महिला कृषी अधिकारी, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीतील एक कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली आहे. (Ahmednagar)

नेवासा तालुक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावासाने सोयाबीन, कपाशी आदी पिके वाया गेली.
शेतकऱ्यांच्या या नुकसानीचे मूल्यमापन व्हावे आणि शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळावी,
यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन काम करत आहेत.
या प्रकरणी अभ्यास करुन नेवासा तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती मदत मिळावी,
याचा जिल्हा प्रशासन अभ्यास करत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना लुबाडण्याचे प्रकार घडत आहेत.
त्यामुळे शेतकरी राजा विवंचनेत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने आता शेतकऱ्यांना थोडा
दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosle) आज नेवासा
तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.

Web Title :-  Ahmednagar | suspension action was taken against anglat the official who stole 400 rupees of panchanama

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा