तलाठी भरती परीक्षा : 11 डमी विद्यार्थ्यांवर FIR दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – बनावट कागदपत्रे सादर करून तलाठी भरती परीक्षेला बसलेल्या 11 डमीं विद्यार्थ्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी यांंना कागदपत्रात गडबड असल्याचा संशय आल्याने चौकशी सुरु केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील 84 तलाठी पदासाठी महापोर्टलमार्फत 2 ते 26 जुलै 2019 दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेतली होती. उमेदवारांनी ही परीक्षा आपापल्या जिल्ह्यातून ऑनलाईन दिली. त्यानंतर 23 डिसेंबर 2019 रोजी 125 जणांची प्रारुप यादी प्रशासनाने जाहीर केली. त्या उमेदवारांना 3 ते 7 जानेवारी दरम्यान कागदपत्रांच्या छाननीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पडताळणी केल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्रावरील फोटो आणि प्रत्यक्षातील उमेदवार याबाबत संशय आल्याने त्यांनी चौकशी सुरु केली. समाधानकारक उत्तरे न मिळ्लायने त्यांनी परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फूटेज मागवून त्याची तपासणी केली असता. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या सह्या जुळत नव्हत्या. तसेच एका मुलीच्या नावासमोर पुरूष असे लिहिले होते अशा बाबी त्यांना आढळल्या होत्या. यात 11 तोतया उमेदवार आढळल्याने त्यांच्यावर गुन्ह दाखल केला आहे.