नगर अर्बन बँकेच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ, प्रशासक मिश्रा यांचा निर्णय

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर अर्बन बँकेच्या ठेवीवरील व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. ठेवींची संख्या वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ठेवीदारांनी नगर अर्बन बँकेत जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, असे आवाहन एन. सी. मिश्रा यांनी आज केले आहे.

१०९ वर्षाची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे, बँकेने सन्माननीय ठेवीदारांसाठी ठेवींच्या व्याजदरात वाढ करण्यात आलेली आहे. ठेवींचे व्याजदर १ ते २ वर्षासाठी ७.७५% ऐवजी ८% व १८१ दिवसांसाठी ८% ऐवजी ८.२५% वाढविले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानुसार इतर बँकेच्या ठेवींवरील व्याजदरात नजिकच्या काळात ०.३५% कपात होणार आहे. या स्थितीमध्ये नगर अर्बन को.ऑप.बँकेने आपल्या सन्माननीय ठेवीदारांना ठेवींवरील व्याजदरात वाढ करुन दिलासा दिलेला आहे.

बँकेचे हितचिंतक, व्यापारी, सभासद, खातेदार, ठेवीदार तसेच बँकेचे निवृत्त कर्मचारी यांनी आपल्या ठेवी बँकेमध्ये ठेवून दैनंदिन व्यवहार करणेस सुरुवात केलेली आहे. तरी ठेवींवरील वाढलेल्या व्याजदराचा जास्तीत जास्त फायदा सर्व ठेवीदारांनी घ्यावा असे आवाहन नगर अर्बन बँकचे प्रशासक एन. सी. मिश्रा यांनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त