अहमदनगर : विखेंच्या राजकारणाचा महायुतीला 3 जागांवर फटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर जिल्ह्यात महायुतीची 12-0 अशी परिस्थिती करण्याची घोषणा नुकतेच भाजपात गेलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. मात्र भाजपाला जिल्ह्यात अवघ्या तीन जागा मिळाल्या. महायुतीच्या तीन जागा विखेंच्या राजकारणामुळेच गेल्या. त्यांच्या कुरघोडीच्या रणनितीने जिल्ह्यात भाजपाची दाणादाण उडाली, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांची सख्खे बंधू राजेश परजणे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहिले. परजणे हे विखेंच्या शब्दाबाहेर जातील, अशी परिस्थिती अजिबात नाही. उलट विखेंची यंत्रणा परजणे यांच्या बाजूने उभी राहिली. असे असतानाही त्यांनी निवडणूक लढणे व चांगली मते खाणे हे स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाचे महत्त्वाची कारण ठरले आहे. कोल्हे यांचा अतिशय कमी मतांच्या फरकाने पराभव झालेला आहे.

पारनेर विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर विखे पाटील यांचे कट्टर समर्थक नंदकुमार झावरे व पारनेर पंचायत समिती सभा राहुल झावरे यांनी वेगळी राजकीय भूमिका घेऊन राष्ट्रवादीचे निलेश लंके यांचा प्रचार केला. झावरे व विखेंची सर्व यंत्रणा राष्ट्रवादीचे लंके यांच्या बाजूने उभी राहिली. याचा मोठा फटका विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांना बसला. त्यामुळे त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

लोकसभा निवडणुकीपासून शिवाजी कर्डिले यांच्यासोबत डॉ. सुजय विखे यांचे बिनसले होते. कर्डिले यांनी विखेंना भाजपात आणले, त्याच कर्डिलेंचा काटा काढण्यासाठी विखे यांनी राजकीय व्यूहरचना केली. त्याचाच परिणाम म्हणून कर्डिले यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले
विखे यांच्या राजकारणामुळे महायुतीच्या तीन जागा गेल्या

Visit : policenama.com