Coronavirus : विमानात बसण्यापुर्वी ‘या’ 10 नियमांचं करावं लागेल पालन, अन्यथा प्रवेश बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी सरकारने २५ मेपासून देशांतर्गत उड्डाण संचालनाची घोषणा केली आणि गुरुवारी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) ने स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली. विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी एएआयने बनवलेले नियम पाळले पाहिजेत. एसओपीमध्ये दिलेले दहा नियम खालीलप्रमाणे आहेत.

नियम १: प्रवाशांना प्रवासाच्या ठरलेल्या वेळेच्या २ तास आधी विमानतळावर पोहोचावे लागेल आणि पुढील ४ तासांच्या आत उड्डाण करणार्‍या प्रवाशांना केवळ टर्मिनल भवनात प्रवेश करण्याची परवानगी असेल.

नियम २: सगळ्या प्रवाशांनी मास्क, ग्लोव्हज घालणे आवश्यक .

नियम ३: मोबाईलमध्ये ‘आरोग्य सेतु’ अ‍ॅप सर्व प्रवाश्यांसाठी अनिवार्य असेल आणि त्याची एंट्री गेटवर सीआयएसएफ/ विमानतळ कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जाईल. मात्र १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हे ऍप आवश्यक नाही. या अ‍ॅपवर हिरवा रंग न दर्शवणार्‍या प्रवाशांना विमानतळावर प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

नियम ४: टर्मिनल भवनात प्रवेश करण्यापूर्वी सर्व प्रवाश्यांची थर्मल स्क्रीनिंग आवश्यक असेल. एअरपोर्ट ऑपरेटरच्या वतीने शहरालगत अनेक थर्मल स्क्रीनिंग स्टेशन सुरू केले जातील.

नियम ५: प्रस्थान आणि आगमन झोनमध्ये ट्रॉली वापरण्याचे एक योग्य कारण सांगावे लागेल.

नियम ६: टर्मिनल भवनात प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांचे सामान स्वच्छ केले जाईल. चप्पल, बूट निर्जंतुक करण्यासाठी ब्लीचने भिजवलेले मॅट/ कार्पेट असेल.

नियम ७: गर्दी टाळण्यासाठी चेक-इन काउंटर अधिक असतील, त्यासाठी एअरलाइन्सना अधिक कर्मचारी तैनात करावे लागतील.

नियम ८: टर्मिनल भवन आणि परिसरात वर्तमानपत्रे/ मासिके उपलब्ध केली जाणार नाहीत.

नियम ९: एअरपोर्ट ऑपरेटरमार्फत विविध ठिकाणी प्रवासी आणि विमानतळ कर्मचार्‍यांसाठी हँड सॅनिटायझर्स उपलब्ध केले जातील.

नियम १०: सर्व एफअँडबी आणि रिटेल आउटलेट विमानतळांवर खुले असतील.

२५ मेपासून देशांतर्गत प्रवासी सेवा देण्याच्या सरकारच्या घोषणेमुळे विमान कंपन्यांचे शेअर १० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.