आश्चर्यच ! अकाली मृत्यूची पूर्वसूचना मिळू शकते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अकाली मृत्यूची पूर्वसूचना देणारी सिस्टीम नॉटिंगघम यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सपासून तयार केली आहे. हे तंत्रज्ञान मध्यम वयातील तरूणांमध्ये गंभीर आजारामुळे होणाऱ्या प्री मॅच्युअर मृत्यूची माहिती देईल. या संशोधनात ४० ते ३९ वर्षांच्या ५ लाख लोकांना सहभागी करण्यात आलं होतं.

या संशोधनानुसार या आर्टिफिशिअल इंटॅलिजन्सच्या नव्या मॉडलचे नाव रेंडम फॉरेस्ट आहे. याद्वारे सूक्ष्म माहिती मिळते. पूर्वीच्या तंत्रांपेक्षा हे तंत्र अधिक चांगल्याप्रकारे काम करतं. नॉटिंगघम यूनिव्हर्सिटीचे असिस्टंट प्रोफेसर स्टीफन वेंग च्यानुसार, मृत्यूचा केत वा इशारा देणाऱ्या या सिस्टीममध्ये आधी अनेक प्रकारची माहिती विचारली जाते. यात व्यक्तीची भौगोलिक स्थिती, बायोमेट्रिक माहिती, क्लीनिकल आणि लाइफस्टाइलशी निगडीत बाबींचा समावेश असतो.

अनेक वर्षांपासून यावर शास्त्रज्ञ काम करत होते. जेणेकरून लोकांना कॉम्प्युटरच्या मदतीने आरोग्याच्या धोक्यांबाबत माहिती मिळू शकते. अशाप्रकाचं तंत्र हे हेल्थ रिसर्चमध्ये नवीन आहे. पण याचं तंतोतंत पालन करणं कठीण आहे. मात्र, एआयच्या मदतीने आरोग्याची काळजी घेणे फायदेशीर ठरू शकतं.

सध्या कॉक्स रिग्रेशन नावाचं एक असंच मॉडेल आहे, जे वय आणि लिंग या आधारावर माहिती देतं. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, केवळ एक-दोन गोष्टींच्या आधारावरच शारीरिक धोक्याची खोलवर माहिती दिली जाऊ शकत नाही. या तंत्रज्ञानामुळे सावधानी बाळगून गंभीर आजारास तोंड देणे शक्य होऊ शकते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like