Video : ‘हा’ प्रसिद्ध ‘कॉमेडियन’ डिप्रेशनमध्ये !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध कॉमेडियन आणि लेखक तन्मय भट्ट सोशल मीडियापासून दूर आहे. २०१८ मध्ये बॉलीवूड मधील #Metoo अभियान मध्ये भट्ट यांचावर कॉमेडियन उत्सवाच्या विरोधात कारवाई न करण्याचे आरोप लागले होते. छळ केल्याच्या आरोप नंतर ही कंपनी बंद करण्यात आली. खूप दिवसानंतर तन्मयने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितले की, तो या दिवसांमध्ये कोणत्या अवस्थेत जगत आहे. तन्मय भट्टने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, ”मी या दिवसांमध्ये कठीण परिस्थिती आहे, मला नाही माहित ही परिस्थिती कधी सामान्य होईल परंतु जेव्हा मी चांगल्या परिस्थिती येईल तर तेव्हा मी सगळ्यांचे आभार मानेल ज्यांनी मला सपोर्ट केला आहे. खास करून त्या लोकांचे मी आभार मानेल ज्यांनी मला या काळात साथ दिली.”

डिप्रेशन बद्दल बोलताना तन्मयने सांगितले की, ‘लोक मला विचारता आहेत की माझ्या आयुष्यात मी आणि एआईबीच्या प्रकरणा बद्दल काय चालू आहे ? मला वाटते की ऑक्टोबरमध्ये जे झाले, त्यानंतर पासून मी मानसिकरीत्या खूप दु:खी आहे आणि सोशल लाईफ मध्ये ऑफलाइन असो वा ऑनलाईन, मी ती भूमिका योग्यरीत्या निभावू शकत नाहीये.

तन्मयने पुढे सांगितले की, गेल्यावर्षी डॉक्टर्सने मला सांगितले की मला क्लीनिकल डिप्रेशन आहे आणि मी या प्रकरणात काहीतरी करायला पाहिजे. मला असे वाटे की मी कंटेन्ट लिहिण्याच्या परिस्थिती नाहीये. गेल्या काही महिन्यांपासून अशी परिस्थिती आहे की मी पुन्हा पहिल्यासारखा सामान्य होऊ शकेल ? एआईबी कॉमेडी ग्रुपने अनाउंसमेंट केली होती की, तन्मय या कंपनीच्या सीईओ पदा पासून हटणार आहे आणि या कंपनीचे यूट्यूब चॅनेल येणाऱ्या काळात बंद होणार आहे.

अभिनेत्री दीपाली सय्यदची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी !

आश्चर्यच ! आता पोटातील गॅस बाहेर पडताच दुर्गंधी ऐवजी दरवळेल सुगंध

‘केस गळणे’ हा असू शकतो आजारपणाचा संकेत

‘मेंदू’ आणखी तल्लख करण्यासाठी ‘हे’ उपाय आहेत फायदेशिर

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी

पारधी समाजाच्या महिलेचा विनयभंग करून मिरच्या चोरीच्या आरोपावरून मारहाण