‘हा’ अभिनेता वयाच्या १८ व्या वर्षांपासून एड्सग्रस्त ; आता करतोय जगण्यासाठी धडपड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटन येथील सुप्रसिद्ध क्विज शो ‘एगहेड्स’ चा एकेकाळचा सुपरस्टार असलेला ‘सीजे डि मूई’ सध्या मात्र परिस्थतीशी झुंज देत आहे. एका मीडिया हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या कित्येक वर्षांपासून एड्स या आजाराने तो त्रस्त आहे. वयाच्या १८ व्या वर्षांपासून तो एड्सग्रस्त आहे. अशी माहिती स्वतः ‘सीजे डि मूई’ याने ट्विट करून संगितली आहे. त्याने असेही म्हंटले आहे की “मला वयाच्या १८ व्या वर्षी एड्सची लागण झाली होती. त्यावेळी मी सेक्स वर्कर म्हणून काम करत होतो. मला या गोष्टीची अजिबात लाज वाटत नाही. कारण मला जगण्यासाठी असे करावे लागले”.

https://twitter.com/cjdemooi/status/1120755798810996737

एका जमान्यातील छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध शोचे ते परीक्षक होते. २००६ साली एका व्यक्तीने त्यांच्यावर हत्या केल्याचा खोटा आरोप केला त्यामुळे या शो मधून त्यांना काढून टाकण्यात आले होते. त्यांना शो मधून काढून टाकण्यात आल्यानंतर खूप वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. त्यांना त्यांचे घर देखील गहाण ठेवावे लागले होते त्यामुळे ते बेघर झाले होते. त्यांच्यासाठी फंडिंग गोळा करण्यात आले होते.

https://twitter.com/cjdemooi/status/1119655708386000896

ट्विट करुन ‘सीजे डि मूई’ यांनी आपल्या आयुष्यातील कठीण काळाविषयी मन मोकळे करीत ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हंटले आहे की “मला ३० वर्षांपासून एड्स आहे. गेल्या तीन वर्षात मी खूप काही सहन केले. कारण माझ्याकडे कामदेखील नव्हते. बाहेरून मी स्वस्थ आहे. आताही मी धावतो आणि साकारात्मक राहून स्वतःला चांगले ठेवण्याचे प्रयत्न करतो आहे.

https://twitter.com/cjdemooi/status/1119942643289600000

सीजे डी मूईने लोकांचे आभार मानत सांगितले की, माझ्यावरील प्रेम दर्शविल्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे असे म्हंटले आहे. सध्या ‘सीजे डि मूई’ यांचे अकाउंट त्यांचा मित्र चालवतो. सोशलवर केलेल्या अहवानानंतर आतापर्यंत ३३४८.७२ पाउंड जमले असून यामुळे त्यांचे घर वाचवण्यासाठी मदत होणार आहे. सध्या ‘सीजे डि मूई’ त्यांच्या मित्रांसोबत राहत आहेत.