AIIMS | कपड्याच्या मास्कने वाढला धोका ! जाणून घ्या AIIMS च्या रिसर्चमध्ये झालेला खुलासा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – AIIMS | दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेत (AIIMS) 352 रूग्णांवर करण्यात आलेल्या संशोधनाचे निष्कर्ष समोर आले आहेत. यामध्ये म्हटले आहे की, कमी रोगप्रतिकारशक्ती (low immunity) असलेल्या रूग्णांनी कपड्याचा मास्क घालू नये. डॉक्टरांनुसार मोठ्या कालावधीपर्यंत कपड्याचा मास्क घातल्याने घाण झाल्याने ब्लॅक फंगस होण्याची शक्यता वाढते. विशेष करून असे रूग्ण ज्यांची रोगप्रतिकारशक्ती खुप कमी आहे. त्यांनी खुप जास्त काळजी घेतली पाहिजे.

संशोधनातील महत्वाचे निष्कर्ष
– संशोधनात ब्लॅक फंगसने पीडित मिळालेल्या केवळ 18 टक्के रूग्णांनीच एन95 मास्कचा वापर केला होता.
– तर संशोधनात ब्लॅक फंगस संसर्ग नसलेल्या जवळपास 43 टक्के अशा रूग्णांनी एन95 मास्कचा वापर केला.
– 52 टक्के लोक करत आहेत मास्कचा वापर
– 71.2 टक्के लोकांनी सर्जिकल किंवा कपड्याचा मास्क वापरला होता.
– कपड्याच्या घाणेरड्या मास्कचा अनेकदा आणि खुप जास्त वापर केला जातो.
–  कपड्याच्या मास्क खाली सर्जिकल मास्क घाला.

असा घाला मास्क
1- मास्कने नाक आणि तोंड पूर्णपणे झाकून घ्या.
2- मास्क वापरताना त्यास बाहेरून स्पर्श करू नका.
3 -सर्जिकल मास्क एकवेळ पेक्षा जास्त वापरू नका.
4 -कपड्याचा मास्क चांगला धुतल्यानंतर घाला.
5 -मास्क कधीही उलटा वापरू नका.

Real Estate in Pune | पुण्यात रियल इस्टेटला येणार सुगीचे दिवस; झानडू रियल्टीची प्रतिष्ठित नाईकनवरे डेव्हलपर्सशी भागीदारी

Weight Lose Tips | डायटिंग अन् उपवास नव्हे तर हे केल्यानं वेगानं कमी होईल वजन, जाणून घ्या

Rajsthan | भाजपा नेत्यावर हल्ला, शेतकरी आंदोलनकर्त्यांनी केली मारहाण, कपडे फाडले (व्हिडीओ)

Protein Week 2021 | शरीरात दिसत असतील ‘ही’ 8 लक्षणे तर करू नका दुर्लक्ष, प्रोटीनच्या कमतरतेचा आहे इशारा

Ganpatrao Deshmukh | जेष्ठ नेते माजी आ. गणपतराव देशमुख यांचे 94 व्या वर्षी निधन; 54 वर्ष आमदार म्हणून केलं होतं मतदारसंघाचे प्रतिनिधित्व

Diabetes cure | डायबिटीजच्या रूग्णांसाठी खुशखबर ! बायोकॉनच्या नव्या औषधाला मंजूरी; जाणून घ्या कसा फायदा मिळणार