इतक्या वेगानं देशात कोरोना का पसरला? AIIMS चे डायरेक्टर डॉ. गुलेरिया यांनी वाचला कारणांचा पाढा, जाणून घ्या

नवी दिल्ली: दिल्लीस्थित एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी देशात वाढत्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या घटनांवर बरेच काही सांगितले आहे. एम्स चे संचालक म्हणाले की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत असण्याची अनेक कारणे आहेत, परंतू त्यातील प्रमुख दोन कारणे आहेत. प्रथम, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लसीकरण सुरु झाल्यानंतर संसर्गाची प्रकरणे कमी होऊ लागली आणि लोकांनी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे सोडून दिले. हाच काळ होता जेव्हा विषाणूमध्ये बदल घडून येण्याचे प्रमाण जास्त संसर्गजन्य बनले.

गुलेरिया म्हणाले की संसर्ग होण्याच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य यंत्रणेवर खूप दबाव वाढत आहे. आपल्याला रुग्णालयात बेडची संख्या सातत्याने टिकवून ठेवायची आहे आणि वाढत्या घटनांना सामोरे जाण्यासाठी स्रोत वाढविणे आवश्यक आहे. आम्हाला संसर्ग होण्याच्या वाढत्या घटनांवर शक्य तितक्या लवकर नियंत्रण ठवण्याची गरज आहे.

ते म्हणाले की, सध्या देशात बरीच धार्मिक कामे सुरु आहेत आणि विधानसभा निवडणुका चालू आहेत. आपल्याला याची जाणीव करून घ्यावी लागेल की जीवन मौल्यवान आहे. आपण अनेक गोष्टी मर्यादेत करू शकतो, जेणेकरून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि लोकांनी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे.

लस घेतल्यानंतर होतील हे फायदे
ANI च्या मुलाखतीत रणदीप गुलेरिया म्हणाले की आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लस आपल्याला १००% सुरक्षा देऊ शकत नाही. असे होऊ शकते की लस घेल्यानंतरही तुम्हाला कोरोना संसर्ग होऊ शकतो, परंतू लस घेतल्यानंतर शरीरात असलेल्या अँटीबॉडीमुळे व्हायरसचा धोका जास्त प्रमाणावर होत नाही आणि व्यक्तीची स्थिती गंभीर होण्याचा धोका कमी असतो.