Coronavirus : ‘कोरोना’च्या रुग्णांचा उपचार करत असलेल्या AIIMS मधील डॉक्टरच्या डोळ्यात आले अश्रू, म्हणाली – ‘फॅमिली सपोर्टची गरज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात रोज कोरोना व्हायरसची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. याचा धोका रोखण्यासाठी आणि संक्रमित रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टर दिवसरात्र मेहनत करत आहेत. दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) मध्ये कोविड-१९ उपचार विभागात कार्यरत एक महिला डॉक्टर कोरोना व्हायरसच्या आव्हानांबाबत बोलताना भावुक झाली. डॉक्टर अंबिका कुटुंबापासून दूर राहून कोरोना रुग्णांचे उपचार करत आहे. ती म्हणाली कि दिवसेंदिवस प्रकरणे वाढतच चालली आहेत.

अंबिकाने म्हटले, “कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. ही आमच्यासाठी खूप कठीण वेळ आहे. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्याची गरज आहे. जेव्हा कुटुंबातील कोणी आजारी पडते आणि आम्ही त्यांचे उपचार नाही करू शकत तेव्हा खूप त्रास होतो. आम्ही इथे लोकांचे उपचार करत आहोत आणि आम्हालाही आमच्या कुटुंबाच्या पाठिंब्याची गरज आहे.”

तिने भावुक होऊन म्हटले, “इथे मित्र, सहकारी आणि स्टाफ प्रत्येकजण आम्हाला सहकार्य करत आहे, पण कुटुंबाच्या सहकार्याची गोष्ट वेगळी असते आणि आम्हाला सगळ्यांना पाठिंबा आणि प्रेमाची गरज आहे.”

दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून रुग्णांची संख्या ५०० च्या वर पोहोचली आहे. दिल्लीत कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढून ५२३ झाले आहे. यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे तर १९ जण उपचाराने बरे झाले आहेत. दिल्लीत वैद्यकीय कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली आहे, ज्यात बरेच डॉक्टर आणि नर्स देखील आहेत.