सुशांतला विष दिले गेले होते का ? शोधण्यासाठी पुन्हा होणार सीबीआय चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचा मृतदेह १४ जूनला पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात आणण्यात आला होता. दुपारी आणलेल्या मृतदेहाचे रात्रीपर्यंत पोस्टमार्टम करण्यात आले होते. अशा परिस्थितीत सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यास इतकी घाई का केली गेली, असा प्रश्न उपस्थित झाला होता. शवविच्छेदनानंतर सुशांतचा व्हिसेरा तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आला होता. व्हिसेराची तपासणी करणारे एम्सचे वैद्यकीय पथक या प्रकरणाचे निराकरण करण्यात मदत करू शकते.

एम्सची फॉरेन्सिक टीम सुरक्षित ठेवलेल्या सुशांतच्या व्हिसेराची चाचणी करत आहे. सुशांतला विष तर दिले गेले नव्हते ना, असा वैद्यकीय पथकाचा संशय आहे. एम्सचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आणि सुशांत प्रकरणासाठी गठीत मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, दहा दिवसांत ही चाचणी केली जाईल आणि अहवालही येईल. यासंदर्भात वैद्यकीय मंडळाची बैठक १७ सप्टेंबर रोजी होईल.

एम्सकडे व्हिसेरा चाचणीसाठी सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. ही उपकरण एफबीआय वापरते. अशा परिस्थितीत चुकण्याची कोणती संधी नाही. सुशांत प्रकरणात एम्सच्या तीन डॉक्टरांच्या पथकाने सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करणार्‍या डॉक्टरांची चौकशी केली आहे. या चौकशीत एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतच्या गळ्यावरील जखमेच्या खुणेबाबतही प्रश्न केला आहे.

अहवालानुसार, सुशांतच्या गळ्यावरील जखमेच्या खुणेबाबत अनेक प्रश्न आहेत. सुशांतच्या गळ्यावरील जखमांच्या खुणा (LIGATURE MARK) त्याच्या गळ्याच्या मध्यभागी आहेत आणि सरळ रेषेप्रमाणे दिसतात. तर आत्महत्येच्या बाबतीत या जखमा गळ्याच्या अगदी वरच्या बाजूला असतात आणि या खुणा तिरक्या असतात आणि ओरखड्यासारखे दिसतात. असे मानले जात आहे की, एम्सच्या तीन डॉक्टरांनी बॉडीचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या ५ डॉक्टरांना सुशांतच्या गळ्यावर असलेल्या खुणांबाबत मोठे प्रश्न केले आहेत.

या डॉक्टरांना मुंबईत सीबीआय टीमशीही बोलण्याचा अधिकार आहे. तसेच एम्सची ही टीम शवविच्छेदन करणार्‍या डॉक्टर आणि मॉर्चरीच्या कर्मचार्‍यांचीही चौकशी करू शकते.