AIIMS Jodhpur Recruitment 2021 : एम्समध्ये सरकारी नोकरीची संधी, 67700 पर्यंत पगार, अशी आहे अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – AIIMS Jodhpur Recruitment 2021 : ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), जोधपुरने अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2021 आहे. म्हणजे योग्य व इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन या भरतीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. या व्हॅकन्सी अंतर्गत सिनियर रेसिडेंट्सची भरती केली जाईल. अधिकृत नोटिफिकेशननुसार, सिनियर रेसिडेंटच्या एकुण 119 पदांवर व्हॅकन्सी काढली आहे.

महत्वाच्या तारखा…
ऑनलाइन अर्जाची सुरूवात – 09 जानेवारी 2021
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2021

वेतन
119 पदांसाठी होत असलेल्या या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 67700 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

भरतीची माहिती
एम्स जोधपुर सिनियर रेसिडेंट नोटिफिकेशन 2021 नुसार, या भरतीसाठी 45 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. वयाचा हिशेब 10 फेब्रुवारी 2021 पर्यंतच्या आधारावर केला जाईल.

अर्ज शुल्क
सामान्य आणि ओबीसी वर्ग – 1000 रुपये
एससी आणि एसटी वर्ग – 800 रुपये
पीडब्ल्यूडी वर्गासाठी – शुल्क नाही

AIIMS Jodhpur Senior Resident च्या पदावर उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर केली जाईल.